( इन्स्पायर दी इन्स्टिट्यूट स्किल डेव्हलपमेंट ने १९३ विद्यार्थ्यांना केले पारितोषिक व प्रमाणपत्राचे वितरण )
दर्यापूर – महेश बुंदे
इन्स्पायर चा अर्थ स्वतःला पेरित करणे जपान, दुबई, कागजनगर ( तेलंगणा ) दिल्ली, मुंबई ,पुणे, नागपूर ,नाशिक, खामगाव, अकोला, तेल्हारा इंटरनॅशनल स्टुडन्ट या इन्स्पायर द इन्स्टिट्यूट या सोबतआहे आपल्याला अभिमानाची व गौरवाची बाब आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष दर्यापूर अंजनगाव मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केले ते इन्स्पायर ऑफ स्किल्स डेव्हलपमेंटच्या बक्षीस व प्रमाणपत्र वितरणच्या बहुजन राष्ट्रनिर्माण प्रशासकीय अकॅडमी या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रेस क्लबचे सचिव तथा पावर ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष गजानन देशमुख तर संदीप गावंडे सदस्य नगर परिषद दर्यापूर, दीपक तरोने, दत्ता कुंभारकर अध्यक्ष युवा एकता संघटना, नितीन टाले संचालक इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट दर्यापूर, कु शोभा भिसे पर्यवेक्षक प्रबोधन विद्यालय दर्यापूर, मंजूपुरी शिक्षिका एकविरा स्कूल दर्यापूर, सौ. वैशाली टाले दर्यापूर सहसंचालिका इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट दर्यापूर हे उपस्थित होते. याप्रसंगी स्वामी विवेकानंदन यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार बळवंत वानखडे ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख , दीपक तरोने दत्ता कुंभारकर , संदीप गावंडे सदस्य न प दर्यापूर, शोभाताई भिसे पर्यवेक्षक प्रबोधन विद्यालय दर्यापूर, मंजूपुरी यांचा इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंटचे संचालक नितीन टाले व सौ वैशाली टाले यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सत्कार केला त्यावेळी ओपन इंग्लिश ,अबाकस हॅन्डरायटिंग कोरोग्रफी, बौद्धिक गणित, विशेष म्हणजे महिलांसाठी स्पोकन इंग्लिश विविध कोर्सेस मधून प्रथम, दृतिय, तृतीय, क्रमांक काढून त्यांना पारितोषिक दिल्या जाते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कु शोभा भिसे यांनी व्यक्त केले. त्याप्रसंगी प्रथम द्वितीय तृतीय व प्रोत्साहनपर असणाऱ्या मुलांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी प्रामुख्याने संतोष मिसाळ क्रीडा शिक्षक प्रकाश मिश्रा व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्ता वीवना नितीनजी टाले तर सूत्रसंचालन एंजल काळे वैष्णवी राजपूत तर आभार सौ वैशाली टाले यांनी मानले कार्यक्रम यशस्वीकरिता यशश्री मिसाळ, परी मिश्रा, जय काळे, मनस्वी दानले ,कृतिका गहले, समिदा काळे यांनी परिश्रम घेतले.