Post Views: 759
चांदुर रेल्वे -सुभाष कोटेचा/धिरज पवार.
नुकत्याच यूथ स्पोर्ट डेव्हलवपमेंट मल्टीपरपज असोसिएशन महाराष्ट्र (इंडिया ) डिस्ट्रिक्ट ॲमेच्चुर स्पोर्ट कराटे ङे असोसिएशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे होत असलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेची निवड चाचणी म्हणून दूसरी जिल्हा कराटे स्पर्धा श्री हनुमान मंदिर सभागृह माया नगर अमरावती येथे नुकतीच यशस्वी रित्या पार पडली
असून या स्पर्धेत जवळपास अमरावती जिल्हातील सर्वच तालुक्यातील कराटे पटुनीं सहभाग नोंदविला या स्पर्धेत चांदुर रेल्वे शहरातील सर्ववांचे परिचित सेन्साई संदिप देशमुख सर यांच्या मार्गदर्शनातून सर्व लहान चिमुकल्यांनी आपल्या खेळांचे सुंदर असे प्रदर्शन करत सुवर्ण रौप्य कांस्य पदक प्राप्त करून चांदुर रेल्वे शहरांचे नाव उंचवले सर्व यशस्वी खेळाडू मध्ये राहुल आठवले तिलक चव्हाण अभिराम पाटक राम राठी दादु वानखडे रेवन शिरसागर कु.केतकी पाटक यांनी आपल्या खेळाचे सुंदर असे प्रदर्शन करत सहभाग नोंदविला या सर्व कराटे पटुनीं आपल्या यशाचे श्रेय आपलो मुख्य प्रशिक्षक सेन्साई संदिप देशमुख व आपल्या आई-वडिलांना दिले .
या सर्व खेडाळूंचे चांदुर रेल्वे शहारातील मेहते गणेश राय विनय कडु समिर जानवाणी विनोद काळमेघ अमित तळोकार दिनेश काळमेघ दर्गेकर उमेंद ढगे सुरेश तिखे विनोद देशमुख महेश कलावटे वरठे तसेच चांदुर रेल्वे शहारातील सर्प गणमान्य नागरिकांनी या खेळाडू चे अभिनंदन केले .