पुणे : ग्रीन फाऊंडेशन आधारस्तंभ श्री.बाळासाहेब कोळपे तसेच सौ.विभा गिरिश गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रीन फाऊंडेशन शाखा पुणे शहर, विभा गिरिश ट्रस्ट यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे रक्तदान शिबिर महात्मा फुले सांस्कृतिक भवन दुसरा मजला शिवरकर मार्ग,वानवडी गाव .पुणे येथे रक्तदान शिबीर पार पडला या कार्याला नागरिकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळला. या शिबिराची सुरुवात ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, ग्रीन फाऊंडेशन शाखा पुणेशहर अध्यक्ष दिनेश बांडागळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिनेश बांडागळे, सुशांत भांबुरे, अनिकेत पाटोळे, अक्षय बांडागळे, मनोज बांडागळे, सुरज शिंदे,नागेश सोनवळे, कुलदीप कंजाळकर,केदार सोनवळे,रोहित सरस्वत,प्रतीक भगत,भागवत शिंदे,
सुरज पाल ,आकाश दळवी ,बिरूदेव भास्कर, किरण बाचकर, विनोद बाबा यादव,अभिषेक शेंडगे उपस्थित होते.
