प्रतिनिधी सुभाष कोटेचा :-
चांदुर रेल्वे :- आज भारतीय समाजात एक नाहीं अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत ज्यांचे निराकरण करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत आणि करित आहे.परंतु सामाजिक समस्या ह्या समाजांच्या सहभागाने सुटू शकतात यांवर संघाचा विश्र्वास आहे म्हणून संघ सामाजिक समस्या निराकरण करण्यासाठी समाजाच्या सर्व विविध क्षेत्रात जावून काम करित आहे.

म्हणून संघाकडून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्याकरिता स्वयंसेवकांनी स्वताहाला संघकार्याकरिता झोकून देऊन दिग्विजयाचा संकल्प करावा असे आवाहन प्राचार्य श्री.अरविंदराव देशमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चांदुर रे.नगराच्या विजयादक्षमी उत्सवाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून केले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून चांदुर रे.नगरातील ज्येष्ठ पत्रकार कापडव्यवसायी श्री.जयप्रकाशजी चोरडिया यांनीही प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना, संघ हे सामाजिक व सांस्कृतिक संघटन म्हणून शतकपुर्तीकडे वाटचाल करीत असतांना समाजाच्या अपेक्षापुर्ती होईल अशी अपेक्षा केली.याप्रसंगी मंचावर जिल्हा संघचालक अॅड.अरुण जिचकार ता.संघचालक श्री.वासुदेवराव मानकानी उपस्थित होते प्रस्ताविक परिचय नगरसहकार्यवाह तेजस वाट ,सांघिक गित पंकज मानकानी, वैयक्तिक गित, प्रतिक सपकाळ,अमृतवचन अनिमेष जैन तर सुभाषित यश मानकानी यांनी म्हटले.
खूप छान अप्रतिम झाले भाषण!