मंगरूळपीर येथे महिला व मुलींसाठी समुपदेशन व सल्ला केंद्राचे उद्घाटन

प्रतिनिधी फुलचंद भगत:-


वाशिम वार्ता :-मंगरूळपीर येथे दिनांक 17 /10 /2021 रोजी रविवारी महिला व मुलींसाठी समुपदेशन व सल्ला केंद्र ध्यास व जिव्हाळा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले असून ,या केंद्राचे उद्घाटन मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे व त्यांच्या पत्नी राजश्री यशवंत केडगे यांच्या हस्ते करण्यात आले .

याप्रसंगी मा . यशवंत केडगे उपविभागीय पोलीस अधिकारी उद्घाटक म्हणून होते,तर अध्यक्षा राजश्री केडगे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे अनिल कुमार शर्मा , रविशंकर दिक्षीत , विनोद डेरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.केंद्राच्या संचालिका अवताडे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री यशवंत केडगे यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सौ. राजश्री यशवंत केडगे यांचे शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सुंदर सुत्र संचालन व प्रास्तावीक मेघा नगरनाईक यांनी केले. यावेळी महीला व मूलीसाठी समुदेशन व सल्ला केंद्राची कामकाजाची माहीती दिली .
यावेळी चंदाताई ठाकूर ,गीता बजाज, शिल्पा मांढरे , शुभांगी भोजने , मानेकर, रक्षा शर्मा,कु .जानवी औताडे व मंगरुळपीर शहरातील विविध भागातील महीला व मुलींची उपस्थिती होती .

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!