चाकण वार्ता :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकण पुणे शाखेच्या पुढाकाराने
रविवार दि. १० आॕक्टोंबर २०२१ रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर यशस्वीपणे पूर्ण झाले.
उदघाटनप्रसंगी चाकण पुणे शाखाध्यक्ष ध्रुवशेठ कानपिळे, माजी आमदार राम कांडगे, तुकाराम कांडगे, राजेश कांडगे, अविनाश अरगडे उपस्थित होते.
आगळ्या वेगळ्या पद्धतीने, रोपाला पाणी घालून प्रशिक्षणाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
माजी आमदार राम कांडगे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संत साहित्य व वैज्ञानिक दृष्टीकोन यावर भर दिला, तुकाराम कांडगे साहेबानी सर्वांना शुभेच्छा देत, वेज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्यास सांगितले. सर्व मान्यवरांनी प्रशिक्षणार्थांना, तसेच अनिसच्या कार्यास, चळवळीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. नितीन शिंदे, योगेश कुदळे, विशाल विमल, डॉ. जितेंद्र डोलारे, अतुल सवाखंडे यांनी शिबिरात मांडणी केली.

प्रथम सत्रात डाॕ नितीन शिंदे यांनी फल ज्योतीष :- भ्रम आणि वास्तव या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये राशी आणि ग्रह यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोनाची माहिती प्रत्यक्ष उदाहरणासह मांडली. तसेच वास्तूशास्त्र व पृथ्वीचे परीवलन व परीभ्रमण यांचा यथोचीत संबध जोडून वैज्ञानीक सत्य सर्वांना उलगडून दाखवले.
माननीय योगेश कुदळे यांनी सामाजिक चळवळी आणि सांस्कृतिक विभाग या विषयावर मार्गदर्शन केले सामाजिक चळवळीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा कसा उपयोग होतो, याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये पथनाटक काव्य यांचा समावेश होतो.
डॉक्टर राजेंद्र डोलारे यांनी संत साहित्य अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन केले. संतांनी आपल्या साहित्यातीवा ओव्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन कशाप्रकारे त्याकाळी लिहून ठेवला, याचे प्रत्यक्ष ग्रंथांमधील ओव्यांच्या सह मार्गदर्शन केले.
माननीय विशाल विमल यांनी अनिसच्या कार्याची पंचसूत्री या विषयावर मार्गदर्शन केले.
चाकण पुणे शाखा यामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे सत्कार करण्यात आले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या प्रशिक्षणाच्या दरम्यान विविध गाण्यांच्या स्वरूपात वातावरण आनंदमय ठेवण्यात आले. अशा आनंदमय वातावरणात एकूण सत्तर कार्यकर्त्यांनी करोना चे सर्व नियम पाळून प्रशिक्षण घेतले. यादरम्यान विविध पुस्तकांची विक्री करण्यात आली व अनिसच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली.
पूर्ण प्रशिक्षण शिबिराचे सूत्रसंचालन सौ मेघा सपकाळ यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री तेजस सपकाळ यांनी केले. संपूर्ण प्रशिक्षणाचे आभार श्री प्रमोद बचुटे यांनी मांडले. कार्यक्रम प्रशिक्षणाचे नियोजन, संयोजन श्री अतुल सवाखंडे, संतोष काटे, महेश घाडगे, प्रमोद खामकर, राहूल बर्डे,मयूर कदम, स्वप्नील खंडागळे,श्री. पाटील, पल्लवी सवाखंडे, अर्चना गोजमे, अर्चना बिरदवडे, मेघा सपकाळ यांनी केले. भोजन व्यवस्था श्री मुंगसे यांनी केली.
लहान बच्चे कंपनी टीमनी देखील प्रशिक्षणा मध्ये आपले कलागूण सादर केले. यामध्ये प्रज्वल, विठ्ठल, सागर, प्रज्ञा, गार्गी, प्रणव या पूर्ण टिमाने सत्राच्यासुरवातीस गाणे सादर करुन आपले कलागुण दाखवले.
सकाळी दहा वाजता सुरू झालेले प्रशिक्षण शिबीर सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी पूर्ण करण्यात आले.
हम होंगे कामयाब, एक दिन या गाण्याने शिबीराची सांगता करण्यात आली.