प्रतिनिधी सिद्धार्थ ग्रावकर :-
अमरावती वार्ता :- आजनगाव ता.धामणगाव रेल्वे येथील किरण थाळे वय २० वर्ष यांचा दि.१६.१०.२०२१ रोजी दुपारी शेतात काम सुरू असतांना अचानक विज पडून दुर्दैवाने मृत्यू झाल्याने आजनगावत सर्व शेतकरी वर्गाने तसेच गावातील लोकांना मध्ये शोकाकुल पसरला आहे. कारण किरण थाळे हा खूप कष्टाळू आणि सामाजिक कार्यात सहभागी असायचा आपल्या उत्कृष्ट तबला वादक व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडलचे महत्त्वाचे कार्यकरत असत.
पण अचानक झालेल्या किरण च्या दुर्दैवी मृत्यूमूळे आजनगाव मधील गुरुदेव मंडळाची कार्याची पोकळी कोणी भरून काढू शकत नाही तरी इतर गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य सतत त्याच्या कार्याची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करू व किरण थाळे यांच्या परिवाराला दुःखातुन सावरण्याचा प्रयत्न करू असे मत गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने व्यक्त करण्या आले.