शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाले करिअर मार्गदर्शन
अमरावती – दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील शासकीय निवासी शाळेत दि. १२ डिसेंबर रविवार रोजी दुपारच्या सत्रात शालेय विद्यार्थ्यांना अधीक्षक सुनील बैतुले यांच्या पुढाकाराने हॉलमध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘मार्क नव्हे तर जिद्द ठरवते यश’ या विषयावर विद्यार्थ्यांचे काऊन्सिलर महेश बुंदे यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. करिअरच्या ठरलेल्या वाटांसोबतच वेगळ्या चाकोरी मोडणाऱ्या नवीन वाटांची ओळखही या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना झाली.
