दर्यापूर अंजनगाव तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीने श्रीमदभगवतगीता जयंती उत्सव व पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर येथील वैभव मंगल कार्यालय मुर्तीजापूर रोड दर्यापूर येथे प्रतिवर्षीप्रमाणे भगवद्गीता जयंती उत्सव व श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला दिनांक १३,१४,१५ डिसेंबर २०२१ ला आयोजित करण्यात आलेला आहे त्या निमित्ताने श्रीमूर्तीची व श्रीमद् भगवद्गीता ग्रंथाची भव्य शोभायात्रा संत महंतांची विद्वान अभ्यासकांची व्याख्याने लाभणार आहे तरी अशा विविध कार्यक्रमांद्वारे समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करून समाजात समता एकता व्यसनमुक्ती व अज्ञान जागृती निर्माण करणाऱ्या मंगलमय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन भगवद्गीता जयंती उत्सव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सोमवार दिनांक १३-१२-२०२१ ला समाज प्रबोधन व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सभाध्यक्ष कवीश्वर कुलभूषण परमपूज्य श्री आचार्य प्रवर नागोराज बाबाजी उपाख्य गोपीराज बाबा सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण उद्घाटन सोहळा दिपप्रज्वलन व स्वागत समारंभ तसेच दुपारी ३ ते ५ या वेळात प्रमुख व्याख्याते विद्वतवर्य परम पूज्य श्री निलेश बिडकर जळगाव यांचे जीव सर्वाधिकारी या विषयावर व्याख्यान राहणार आहे तर रात्री ८ ते १०वाजेपर्यंत समाज प्रबोधन कार्यक्रम सप्तखंजेरीवादक प्रबोधनकार संदीपपाल महाराज यांचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम राहील.

तर दिनांक १४ -१२-२०२१ ला रोज मंगळवारला प्रातकाल दैनिक विधि सकाळी १० ते १२ वाजता प्रमुख व्याख्याते परमपूज्य श्री चींतनी जनक आचार्य प्रवर बाभुळगावकर बाबा शास्त्री सुप्रसिद्ध व्याख्याते लेखक कवी औरंगाबाद यांचे तरुणांसाठी भगवद्गीता या विषयावर चर्चासत्र राहणार आहे तर दुपारी ३ ते ४ वाजता प्रमुख व्याख्याते परम पूज्य श्री रमेशराज दादाशास्त्री बीजेगावकर नांदेड यांचे मनुष्य जीवनाची सार्थकता या विषयावर व्याख्यान राहिल तर सायंकाळी पाच वाजता श्री मुर्ती व श्रीमद् भगवद्गीतेची भव्य शोभायात्रा तर रात्री आठ ते दहा या वेळात भजन संध्या कुमार चिरंजीव प्रस्तुत मेरे चक्रधर मेरे शाम सुप्रसिद्ध गायक श्री विशाल जी जोगदेव नागपुर तर बुधवार दिनांक १५ -१२ – २०२१ रोजी भगवद्गीता जयंती उत्सव व श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेचा समारोपीय सोहळा सकाळी चार वाजता पासून तर साडे नऊ वाजेपर्यंत सभा अध्यक्ष कवीश्वर कुल आचार्य परमपूज्य श्री आचार्य प्रवर विद्वांस बाबा शास्त्री फलटण व प्रमुख अतिथी व व्याख्याते कविश्वर पूल आचार्य आचार्य प्रवर कारंजेकर बाबा अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .

तरी समस्त दर्यापूर तालुक्यातील नागरिकांनी या सोहळ्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय ठेवण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!