लोक हितं मम करणीयम.
अमरावती जिल्ह्यातील शिवणगाव गावातील जीवघेणा पूल पुनर्जीवित होणार.
जनतेची प्राण हानी , पिकांचे व शैक्षणिक नुकसान टळणार.
तिवसा मतदार संघातील शिवणगाव येथील सूर्य गंगा पुलावरून मोठ्याप्रमाणावर पुराचे पाणी पावसाळ्यात नेहमीच वाहून जाते यामुळे गावाच्या आजूबाजूच्या शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. प्रसंगी जीवित हानी व खाजगी व सार्वजनिक संपत्ती चे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतो.

आज हा जुना पूल पुनरुज्जीवित करण्यासाठी निधीची मागणी माननीय नितीनजीं कडे मी केली. माननीय नितीन जीने क्षणाचाही विलंब न लावता या पुलाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आवश्यक असलेला निधी देण्याचे निर्देश संबंधितांना दिले व पुढील प्रक्रिया करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यास सांगितले.
माननीय नितीनजींचे या संवेदनशील मागणीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक आभार