पठारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना फराळ वाटप


चाकण ( ता . खेड ) जवळील पठारवाडीच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मुंबई माता बाल संगोपन संस्थेच्या वतीने फराळ किटचे वाटप करण्यात आले . यामध्ये विद्यार्थ्यांकरीता उत्तम प्रतीचे लाडू ,चिवडा , चकल्या , म्हैसूर , अशा पदार्थांचा समावेश आहे . पठारवाडीत अनेक विद्यार्थी गरीब , वंचित तसेच आदिवासी कातकरी समाजाचे आहेत . नुकत्याच शाळा सुरू झाल्याने तोंड गोड करून विद्यार्थ्यांचे स्वागत झाल्याने विद्यार्थी आनंदी दिसत होते .


मुंबई माता बालसंगोपन संस्थेचे सचिव डॉ.माधव साठे , व्यवस्थापक स्वाती शिंदे मॅडम ,अशोक मांजरे यांच्या सहकार्यातून अनेक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला गेला आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण होण्यास मदत झाली आहे .यापूर्वीही संस्थेने शाळेसाठी ई-लर्निंग ,स्मार्ट टीव्ही , सौर ऊर्जा तसेच नियमित पूरक आहार देऊन गुणवत्तेस हातभार लावला आहे .
मुख्याध्यापक मनोहर मोहरे व शिक्षक किरण शिंगडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना या फराळाचे वाटप केले . गटशिक्षणाधिकारी संजय नाइकडे , विस्ताराधिकारी जीवन कोकणे , केंद्रप्रमुख दिलीप टिकेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे .

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!