दर्यापूर – महेश बुंदे
दर्यापूर येथील सुपरिचित योगा प्रशिक्षक म्हणून अमरावती विद्यापीठापासून तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची योगाप्रशिक्षक म्हणून ओळख आहे. आदिवासी विभाग द्वारा ज्या आश्रम शाळा चालविल्या जातात तेथील विद्यार्थी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांना नियमितपणे योगा अभ्यासकाचे धडे देतात तसेच जिल्हा परिषद, नगर परिषद, पोलीस विभाग, आरोग्य सेवेतील डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षणासह ते योगा अभ्यासकाचा परिचय करून देतात. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या घरी विशेषतः महिलांसाठी व्यायामशाळा सुरू केली आहे. या व्यायामशाळेमध्ये गरीब व विद्यार्थिनी वर्गांसाठी निशुल्क वर्ग चालविले जातात. कोरोना महामारीच्या काळात कडक लॉकडाऊन असताना डॉ. मंगलाताई यांनी दर्यापूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात विलगीकरण असलेल्या तब्बल ५५ लोकांना सतत दोन महिने त्यांना नैराश्यातून बाहेर काढून आपल्या योगा प्राणायाणातुन त्यांनी त्यांना जगण्याची नवी दिशा दिली. त्यांच्या या कार्याचा परिचय
पंचक्रोशीतील सर्वांनाच आहे.
