स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- राजगुरूनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दिनांक 11/12/2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करणेत आलेले होते. प्रस्तुत लोकन्यायालयाचे उद्घाटन राजगुरूनगर न्यायालयातील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीष श्री. ए. एम. अंबाळकर सो.व बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.देवीदास युवराज शिंदे पाटील यांचे हस्ते झाले.यावेळी न्यायालयात प्रविष्ट असलेले २३४५ खटले यावेळी निकाली काढण्यात आले.

सदर लोक न्यायालयात एकुण 2165 खटले तडजोडीसाठी ठेवले होते. त्यापैकी 137 खटल्यांत तडजोड होवुन एकुण 3,29,13,565 इतक्या रक्कमेची तडजोडी झाल्या. तसेच दाखल पुर्व 8702 इतके खटले ठेवले होते. त्यापैकी 2208 खटल्यांत 3,44,20,296 इतक्या रक्कमेची वसुली झाली ऐकून 23,45 दाव्यात व खटल्यात तडजोड होऊन ऐकून 6,73,33,861 इतक्या रकमेची वसुली झाली. बार असोसिएशन व पक्षकारांनी केलेल्या सहकार्याबद्दल मुख्य न्यायाधीश अंबाळकर सोा. तसेच बार असोसिएशन अध्यक्ष श्री ऍड.देविदास शिंदे यांनी आलेल्या नागरिकांचे आभार व्यक्त केले.

प्रस्ताविकामध्ये झटपट निकाल लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे त्यामूळे किरकोळ कारणांवरून होणारी भांडणे अनेक वर्ष कोर्टात प्रलंबित राहिलेने दोन्ही पक्षकारांना आर्थिक व मानसिक नुकसान होते. सर्व वाद सामुपचाराने मिटुन पक्षकारांचा होणारा खर्च तसेच मानसिक त्रास कमी होवुन कोर्टातील खटल्यांची संख्या कमी होवुुन प्रत्येकास लवकर न्याय मिळेल.मा. न्यायमुर्ती अंबाळकर सोा. यांनी सर्वांनी एक पाउल पुढे टाकल्यास दुनियेत असा कोणताही वाद अथवा प्रश्न नाही तो चर्चेने त्याची सोडवणुक होवु शकत नाही. पक्षकारांनी त्यांची इच्छाशक्ती दाखवल्यास कोणताही वाद हा आपआपसात समजुतीने मिटु शकतो. त्या आदेशाला न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्व असते, त्यामुळे जास्तीत जास्त पक्षकारांनी अनेक वषॅपासुन प्रलंबित असलेले वाद एकत्र बसुन, चर्चा करून लोक न्यायालयाचे माध्यमातुन मिटवावे असे अवाहन सर्व पक्षकारांना केले आहे.

सदर कार्यक्रमाचे वेळी राजगुरूनगर न्यायालयातील दिवाणी न्यायाधीष व स्तर श्रीमती. एस. एस. पाखले मॅडम, श्री. के. एच. पाटील सोा., श्री. जी. बी. देषमुख सोा., दिवाणी न्यायाधीष क. स्तर श्रीमती. आर. डी. पतंगे मॅडम, श्री. पी. ए. जगदाळे सोा., श्रीमती. एन.एस. कदम मॅडम, तसेच बार असोसिएषनचे अध्यक्ष श्री. अॅड. देविदास शिंदे पा. यांचे उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन बार असोसिएशनचे सदस्यअँड. स्नेहल पवळे मॅडम यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक अॅड. देविदास शिंदे पा. यांनी केले तर अध्यक्षीय भाषण मा. न्यायमुर्ती अंबाळकर सोा. यांनी केले व खजिनदार अँड.माणिक वायाळ यांनी आभार व्यक्त केले. तसेच खेड बारचे कार्यकारणीचे सचिव अॅड. संदीप मलघे, अॅड. संदीप गाडे, सदस्य अॅड. पवळे मॅडम, अॅड. राऊत मॅडम, अॅड. कोकणे मॅडम व बहुसंख्येने सर्व वकिल सभासद व पक्षकार हजर होते. संदीप दरेकर, अॅड. आरती टाकळकर मॅडम, अॅड. अतिक सय्यद, अॅड. अश्विनी लबडे मॅडम यांनी काम पाहिले. चे अध्यक्ष श्री. अॅड. देविदास शिंदे पाटील यांनी आभार व्यक्त केले.
