तळेगांव दशहरा पोलीस स्टेशनची जुगार अड्ड्यावर कारवाई

अमरावती वार्ता :- मा. पोलीस अधीक्षक, श्री. अविनाश बारगळ सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक मा.शशिकांत सातव सर, उप विभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव साहेब चांदुर रेल्वे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार अजय आकरे यांचे आदेशाने दि.10/12/2021 रोजी आॕपरेशन आॕलआऊट दरम्यान गोपनीय माहितीवरून पोलीस ग्राम धनोडी येथे जुगार रेड करण्या करिता गेलेले असताना काही इसम जुगार खेळताना आढळून आले असता त्यांच्या वर तळेगांव दशहरा पोलीस स्टेशन पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून मुद्देमाल नगदी 25200 रू 5 मोबाईल किंमत अंदाजे 34000 व 4 मोटर सायकल किमत अंदाजे 200000 असा एकून 259200 रूपयेचा माल जप्त केला आहे.

यात पकडलेले आरोपी
1) शेख सोनू शेख ऊस्मान वय 28 वर्षे रा. धनोडी, 2) आविनाश विष्णू चवरे वय 30 वर्ष रा. सुपलवाडा,3) सचिन मारोतराव देशमुख वय 30 वर्ष रा. चांदूर रेल्वे,4) अविनाश गणेश खवसे वय 24 वर्ष रा. सुपलवाडा,5) सागर सुरेंद्र खडसे वय 28 वर्ष रा. धनोडी यांना अटक केली असून यात वसंता गाढवे ,योगेश रामचंद्र खरूले,दिलीप संतोष मानकर हे तीन आरोपी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

सदर कार्यवाही पथक
Api संदिप बिरांजे, Hc संतोष सांगळे,NPC मनीष आंधळे ,PC बंडू मेश्राम,PC संदेश चव्हाण,PC मनीष कांबळे, PC गौतम गवळे हे असून पुढील अधिक तपास तळेगांव दशहरा पोलीस स्टेशन करत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!