मेळघाटातील दुर्गम गावं रायपुर येथे राष्ट्रीय सेवा योजना व एन. सी.सी विभागाच्या व वतीने आदिवासींना दिली मायेची ऊब व शालेय साहित्याचे वाटप

ओम मोरे /अमरावती

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती राष्ट्रीय सेवा योजना विभाग संलग्नित, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय,अमरावती राष्ट्रीय सेवा योजना व एन.सी.सी. विभागाच्या वतीने मेळघाटातील अति दुर्गम गाव रायपूर, येथे गरम कपडे ब्लँकेट व शालेय साहित्य( पेन पेन्सिल वह्या, नोटबुक, स्केल, रबर) तसेच इतर कपडे व खाऊ इत्यादी चे वाटप करण्यात आले.

महाविद्यालयातील प्राचार्य तथा प्राध्यापक, शिक्षक इत्यादींच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रत्यक्ष रायपूर, येथे जाऊन जिल्हा परिषद शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गावातील विधवा, निराधार, निराश्रित स्त्री व पुरुष यांना गरम कपडे साड्या व ब्लँकेट आणि लहान मुलांचे कपडे इत्यादी चे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर दिवाळीचा फराळ व लहान मुलांना बिस्कीट देण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. रामेश्वर भिसे यांनी गावकरी व विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक मार्गदर्शन केले. शिक्षण घेऊनच आपण आपली परिस्थिती सुधारू शकतो असा विचार त्यांनी मांडला. त्याचबरोबर गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. सुजाता साबणे यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ किशोर साबळे यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता डॉ जयराम गायकवाड,डॉ. ज्ञानेश्वर नामुर्ते कार्यक्रम अधिकारी, डॉ.सुवर्णा गाडगे महिला कार्यक्रम अधिकारी, डॉ. गजानन भारती एन सी सी प्रमुख, त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री संजय साबळे सर व श्री बेलसरे सर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजनाकरिता परिश्रम घेतले. रायपूर शाळेतील मुख्याध्यापक श्री बेलसरे सर संचालन केले व शिक्षक श्री संजय साबळे सर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

महाविद्यालयातील डॉ वर्षा चिखले,डॉ वंदना देशमुख,डॉ संगीता भुयार, डॉ वैशाली देशमुख, डॉ सुजाता सबाणे, डॉ अपर्णा सरोदे, डॉ सुवर्णा गाडगे, डॉ नितीन चांगोले,डॉ उमेश कडू, डॉ किशोर साबळे, डॉ जयराम गायकवाड,डॉ ज्ञानेश्वर नामुर्ते तसेच शिवा रेडे, संदीपयेवले इत्यादिनी प्रत्यक्ष रायपूर येथिल जिल्हा परीषद शाळेत जाऊन साहित्य वाटप केले .रा .से .यो स्वयंसेवक व सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकत्तेर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!