दर्यापूर – महेश बुंदे
रुग्णांच्या सेवेत असलेले डॉ. नितीन सावरकर साईबाबा हॉस्पिटल कोकर्डा, दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने १२ डिसेंबर रोजी साईबाबा हॉस्पिटल मेन रोड कोकर्डा येथे लहान, तरुण, वयस्कर नागरिकांसाठी मोफत हृदय रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हृदय रोग तज्ञ डॉ. अक्षय ढोरे या शिबिरात रुग्ण तपासणी करणार आहेत. सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत तपासणी होणार आहे. डॉ. अक्षय ढोरे यांच्या अनुभवी मार्गदर्शन व उपचाराचा लाभ येणाऱ्या रुग्णांना मिळणार आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गरजू रुग्णांच्या सर्व प्रकारच्या हृदयरोग शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल मध्ये मोफत केल्या जातील.
कोविड नियमावलीचे संपूर्ण पालन करून शिबिर होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. नितीन सावरकर ( मो. ९७६५६५६५०४ )