Post Views: 725
वेतन व वेतनवाढ मिळावी तरच संपमागे
जिल्ह्यातील अभियंता यांनी दिले पालकमंत्री यांना निवेदन
दर्यापूर – महेश बुंदे
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये सन २०१६ पासून संपूर्ण राज्यात १३०० कर्मचारी अल्प मानधनावर कार्यरत आहेत. ग्रामीण गृह अभियंता यांना प्रति घरकुल ७५० रुपये एवढे कमी मानधन दिले जाते ते सुद्धा कुठल्याही शासकीय सवलतीविना तरी सुद्धा गेल्या सात महिन्यांपासून सर्व गृह निर्माण अभियंता मानधन पासून वंचित आहेत. शासन दरबारी वेळोवेळी याकरिता पाठपुरावा करण्यात आला आहे.
तरी सुद्धा याची कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. तरी यावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी १ डिसेंबर पासून राज्यभरातील कर्मचारी संपावर आहेत. सहा महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने लवकरात लवकर मागील वेतन व वेतनवाढ मिळावी तरच संप मागे घेऊ या मागणी करिता अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण गृहअभियंता यांनी राज्याच्या महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर याना आज दि १० डिसेंबर रोजी निवेदन सादर केले.
यावेळी ग्रामीण गृह अभियंता दत्ता सवळे ,अंकुश टोपले,आदित्य पेलागडे, राहुल खोब्रागडे,सुमित कुंबलवार,अक्षय धाकडे, हितेश लांडे,संजय तांबे,प्रसाद जड,चेतन मोहोड,प्रणिता ठाकरे,सागर घुरडे,दिनेश शेंडे, अक्षय पेलागडे आदी उपस्थित होते.