योग्यभाव मिळत नसल्याने धारणी येथील शेतकरी सोयाबीन घेऊन दर्यापूर मार्केट मध्ये सहा हजार सहाशे रुपये मिळाला भाव

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव संपूर्ण जिल्हा बरोबरच इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला भाव मिळतो यासाठी ओळखले जाते. याचे उदाहरण म्हणजे धारणी येथील शेतकरी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर मध्ये सोयाबीनला उच्च भाव मिळत असल्याने आपला माल घेऊन आले. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात सुद्धा दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव धान्याचा उच्च भावासाठी प्रसिद्ध असल्याने इतर तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातील शेतकरी आपल्याला चांगला भाव मिळावा त्यासाठी दर्यापूर मार्केट मध्ये आपला माल घेऊन येतात.

आज दि. १० रोजी धारणी येथील शेतकरी बाबू जावरकर अमरावती, राजू जावरकर, बळीराम धरसिंगे, रामकीसन मोतीराम जावरकर, सुनीताबाई रामकीसन जावरकर हे शेतकरी आपले धान्य घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत दर्यापूर येथे घेऊन आले व आपला माल ६६०० चांगल्या भावात गेल्याचे समाधान त्यांचा चेहऱ्यावर होते या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटिल बरवट, उपसभापती नंदू पाटिल ब्राम्हणकर व सचिव हिम्मत मातकर हे उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!