कारंजात एकदिवशीय औद्योगिक जागृकता कार्यशाळा उत्साहात
प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:-आकांक्षीत जिल्हा असलेल्या वाशीम जिल्ह्याचे मागासलेपण ग्रामोद्योगातून दूर होईल. करिता मोठ्या प्रमाणावर लघु व मध्यम उद्योग उभारण्याची आवश्यकता आहे. असे मत महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थाचे जनरल कौन्सिलचे सदस्य तथा प्रसिद्ध जलतज्ञ माधव कोटस्थाने यांनी व्यक्त केले. दि.10 डिसेंबर रोजी कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयात एकदिवशीय कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था( एमगिरी ) खादी ग्रामोद्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदशाखा कारंजा, माजी सैनिक बहुउद्देशीय संघ, स्वा. सै. श्री. क.रा इन्नानी महाविद्यालय, ग्रिन्झा प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त आयोजनातून एकदिवशीय औद्योगिक जागृकता कार्यशाळा उत्साहात पार पडली यावेळी प्रमुख अतिथी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रेय निनावकर, प्राचार्य डा. हळबे, कृषी विज्ञान केंद्राचे फळ उत्पादन तज्ञ निवृत्ती पाटील, माजी सैनिक सुरेश गोडसे (सातारा) अहमदपूर जि. लातूर बाजार समिती सभापती शिवानंद हिंगणे, एमगिरी अधिकारी वर्ग उपस्थित होता.सर्वप्रथम भारत माता प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख अतिथींच्या हस्ते झाले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या दुर्घटनेतील लष्कर अधिकारीना मौन श्रद्धांजली देण्यात आली. सत्कार समारंभ करण्यात आला.
