वाशिम:-विधान परिषदेच्या निवडणुकीत वाशिम जिल्ह्यात 100% मतदान झाले अाहे.विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात 10 डिसेंबरला झालेले मतदान हे 98.30% झाले.14 मतदारांनी मतदार करणे टाळले.यामध्ये एमआयएमचे 8 तर इतर 6 मतदार आहेत.
या निवडणुकीत शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया व भाजपाचे वसंत खंडेलवाल या दोघांत सरळ लढत झाली.शिवसेना व भाजपा हे नेहमीचेच विरोधक मैदानात असल्याने एमआयएमने या निवडणूकीत तटस्थ राहण्याची भुमिका आधिच जाहीर केली होती.परंतू अन्य सहा मतदारांनी मतदान टाळण्यामागचे कारण कळू शकले नाही.विधान परिषद निवडणूकीत एक-एक मत मिळवण्यासाठी मोठी चुरस असते. अकोला-बुलडाणा-वाशिम जिल्ह्यातील 22 केंद्रांवर आज 100% मतदान झाले.यामध्ये एकूण 822 मतदारांपैकी 802 जणांनी मतदान केले.मलकापूर येथे 5,बार्शिटाकळी 5,शेगाव2,अकोला 1 व बुलडाणा येथे 1अशा 14 मतदारांनी मतदान केले नाही.