प्रतिनिधी जाहिद खान
नांदगाव खंडेश्वर –
अमरावती ते यवतमाळ महामार्गावर माहुली चोर ते धानोरा गुरव च्या मधात दुचाकी ने कार ला धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला प्राथमीक माहीती नुसार सदर गाडी क्रमांक एम एच 27 सी एन 8915 होंडा कंपनीची सीबी शाईन दुचाकी चालक अंदाजे वय 26 वर्ष हा अमरावतीच्या दिशेने जात असताना अमरावती वरुन यवतमाळ च्या दिशेने येणारी टाटा कंपनीची इंडीगो ईसीएस गाडी क्रमांक एम एच 29 ए डी 6123 ला जबर धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

त्यांचा हातावर पवन गोलु असे नाव गोंदलेले असुन त्याची प्राथमिक माहिती मिळाली नाही सदर गाडी नंबर परीवहन च्या ॲप द्वारे तपासले असता पवन गायकवाड असे नाव दाखवत आहे तसेच कार मधील काही व्यक्तीना दुखापत झाल्याने घटनास्थळावरून उपचारा साठी गेल्याचे समजले असुन गाडी मध्ये मिळालेल्या आधार कार्ड वरुन इंडीगो चालक यवतमाळ मधील पांढरकवडा येथील रहिवासी आहेत.सदर दुचाकी चालकाची अतिरिक्त माहीत मिळाली नसुन अकास्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.घटनास्थळावर लोणी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरिक्षक तालन साहेब व त्यांचे सहकारी येऊन घटनेचा पंचनामा करुन पुढील तपास करीत आहे तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे पाठविण्यात आला आहे.
रवि मारोटकर ब्युरो चीफ
