ग्राहकांच्या समाधानाचे उत्तर फक्त आणि फक्त महावितरण,खाजगीकरणाचे षडयंञ हाणुन पाडण्याचे संघर्ष समितीचे आवाहन

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम:- विज वितरणचे खाजगीकरणाचे सरकारचे छडयंञ हाणुन पाडण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घेवून सहभाग नोंदवावा असे आवाहन संघर्ष समितिच्या वतीने करण्यात आले आहे.


केंद्र सरकार कशाप्रकारे नवनवीन कायदे काढत असून यामध्ये विद्युत कायदा 2021 व इतर संशोधन बिलाचे येणाऱ्या काही काळात लोकसभा व राज्यसभेमध्ये पारित करून मंजूर केले जाईल याची जाणीव देशातील काही शेतकरी बांधव व लोकप्रतिनिधी यांना असून सर्व कर्मचारी आपल्या परीने प्रयत्न करत आहेत कशाप्रकारे ग्राहकाचे हित अधिकार यावर मर्यादा घालण्यात आल्या असून कर्मचारी व वीज कंपन्या सुद्धा यामध्ये ढवळून निघणार आहेत सरकार कोणाचेही असो प्रातिनिधिक स्वरूपात लोकशाहीची भावना जोपासणे आवश्यक आहे परंतु काही ठराविक लोकांना लाभ होण्याच्या हेतूने विविध प्रकारचे प्रलोभने दाखवून ग्राहकांची व लोकप्रतिनिधी ची दिशाभूल केली जात आहे शासनाच्या कंपनीवर शासनाची मर्यादा असणार आहे व नियंत्रण सुद्धा शासन व लोकप्रतिनिधी करतात जर काही भांडवलदारांचा ताब्यात जर विज उद्योगा सारखा अत्यंत आवश्यक व जीवन उपयोगी पडणारा व्यवसाय म्हणून ही गरज मांडली गेली तर ती भारतातील पीडित शोषित व गरीब मध्यमवर्गीयांना मिळणे सुद्धा दुर्लभ होणार आहे देशाचा केंद्रबिंदू असलेली मध्यम व साधारण वर्गाची जनता निश्चितच यापासून वंचित ठेवल्याशिवाय भांडवलदार व ठेकेदार राहणार नाही जिथे त्यांना नफा मिळेल तिथेच वीज पुरवली जाईल तिथेच व्यवसाय होईल जिथे नफा होणार नाही विज नाही व नुकसान नाही असे धोरण राबवले जाईल त्यामुळे सामान्य ग्राहक व लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर मर्यादा न येता जे काही कर्मचारी बांधवांनी चालवलेला आंदोलन आहे .

यामध्ये तमाम ग्राहक बंधुवर्ग व लोकप्रतिनिधींनी महत्त्वाचा जीवनाचा मूलभूत भाग व अधिकार म्हणून विज उद्योगाकडे पाहणे गरजेचे आहे व आता तरी जागे होणे गरजेचे आहे त्यांना सरकारी कंपन्या जास्त सुविधा देण्यास तत्पर असतील की कुणी भांडवलदार व ठेकेदार लोकप्रतिनिधींनी सुद्धा विचार करणे गरजेचे आहे त्यांचा सन्मान भांडवलदार व सरकार यापैकी कशात हे अत्यंत गंभीर व प्रज्वलित असा मुद्दा असून यामध्ये यामध्ये आपले व देशाचे हित व भविष्य निर्धारित करेल हळूहळू सगळेच काही खाजगीकरण व्हायला लागलं तर ना आरक्षण मिळेल मूलभूत अधिकार ना कुठल्याही सुख-सुविधा व स्वातंत्र्य व समानता ठेकेदार व भांडवलदार त्यांचा नफा व फायदा हेच केंद्रबिंदू ठेवून व्यवसाय निश्चित करणार ही चूक निश्चितच कुणाला आवाज उचलण्याची संधी देणार नाही व जे लोक भांडवलदारांच्या व ठेकेदाराच्या विरोधात असतील त्यांचे दमन केले जाईल व दडपण आणून आहेतच स्वीकारण्यास लोकांना पर्याय उरणार नाही म्हणून अभी नही तो कभी नही मित्रांनो केवळ वीज उद्योगच नाही तर देशामध्ये जे काही खाजगीकरणाचा डाव सरकारनं र च ला आहे ते हाणून पाडणे अत्यंत आवश्यक आहे सर्वव्यापी व सर्व परी देशातील प्रत्येक नागरिकांनी आज विचार करणे गरजेचे झालेले आहे म्हणून ह्या चळवळीमध्ये लोक प्रतिनिधी कर्मचारी कामगार शेतकरी शेतमजूर मध्यम वर्ग सामान्य वर्ग व गोरगरीब जनता यांनी आज पासूनच खाजगीकरण याविरोधात कायदेशीर व लोकशाही पद्धतीने आपापल्या स्तरावर आपापल्या परीने जमेल तेवढे सहकार्य करावे व आपलं व देशाचे अस्तित्व वाचवण्यासाठी या लोक सहभागी चळवळीमध्ये आपला सहभाग जरूर नोंदवावा खाजगीकरण एक षडयंत्र आहे त्यामुळे देशाला संकटापासून वाचवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी उतरावी असे आवाहन संघर्ष समितीचे श्री शिरीष भाऊ इंगोले कॉम्रेड राजेश भारस्कर कॉम्रेड निलेश घुगे कॉम्रेड पंकज कुमार इंगोले यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!