भारताचे CDS बिपिन रावत आणि 13 अधिकारी यांचं आज हेलिकॉप्टर अपघातात निधन,ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,CDS म्हणजे काय ? वाचा सविस्तर

भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे.तामिळनाडूमध्ये झालेल्या एका कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कुन्नूरजवळ हवाईदलाच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या IAF MI 17 हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

व्हिडिओ

भारतीय हवाई दलानं ट्वीट करून यासंबंधीची माहिती दिली आहे.लष्कारचे इतर १३ लष्कर अधिकारी यांचा ही अकाली मृत्यू बद्दल लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे आणि भारतीय लष्कराच्या सर्व श्रेणीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून दु:ख व्यक्त करण्यात आले आहे.

फक्त शौर्यचक्र विजेते कॅप्टन वरुण सिंग बचावले. मात्र त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कॅप्टन वरुण सिंग हे शूरवीर असून,त्यांना २०२० मध्ये मोठ्या संकटातून तेजस लढाऊ विमान वाचवले हाेते. त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.

दुर्देवी, विषण्ण करणारी दुर्घटना; कुटुंबियांप्रति सहवेदना -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.८ : भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर शौर्याने आणि धडाडीने नेतृत्व करणाऱ्या संरक्षण दलाच्या प्रमुखांचा त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत असा मृत्यू होणं नियतीलाही मान्य असणार नाही. मी जनरल रावत आणि त्यांची पत्नी तसेच अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळं खूप व्यथित झालो आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करून, त्यांच्या कुटुंबियांप्रतिही मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे. ही दुर्घटना अत्यंत विषण्ण करणारी, दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात.

आपल्या शोक संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भारताचे संरक्षण दल हे सुसज्ज आणि बलशाली आहे. या तीनही दलांचे असे संयुक्त प्रमुखपद भूषवण्याचा पहिला गौरवही दिवंगत जनरल रावत यांना मिळाला. त्यांची कारकिर्दही त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि पदाला साजेशीच अशी होती. संरक्षण दलाला तडफदार आणि सर्व आघाड्यांवर ठसा उमटविलेल्या अनुभवी असे नेतृत्व मिळाल्याने आपल्या तीनही दलांचे मनोबल उंचावले होते, त्याचे प्रत्यंतरही अलिकडच्या तीनही दलांच्या कामगिरीतून दिसत होते.

दुर्घटनेत दिवंगत रावत यांच्या पत्नीसह सुरक्षा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ब्रिगेडीयर आणि लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही अंत झाला आहे, हे अत्यंत दुःखद आहे. सुरक्षेतील कुशल, अनुभवी आणि धडाडीचे नेतृत्व गमावणे हे देशाच्या दृष्टीने मोठे नुकसान आहे. एकंदर दुर्घटनाच सबंध देशासह आपल्या सर्वांचे मन विषण्ण करणारी आहे. या सर्व शूरवीरांच्या आत्म्याला शांती लाभावी तसेच या सर्वांच्या कुटुंबियांना हा दुर्देंवी आघात सहन करण्याची शक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

IAF Mi-17V5 अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर
दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जातं. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे. हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरलं जातं.

तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी यावेळी संरक्षणासाठी चिफ ऑफ डिफेंस स्टाफ या पदाची गरज असल्याचे म्हटले.

कारगील युद्धानंतर आलेल्या अनुभवावरून कारगील रिविव्ह कमिटीने भारताने 2 गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली. एक म्हणजे चिफ ऑफ डिफेंस स्टाफ या पदाची निर्मिती करणे, दुसरे म्हणजे स्वदेशी जीपीएस तयार करणे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली कारगील युद्ध झालं त्यावेळी भारतीय जवानांनी मोठं शौर्य गाजवलं. कारगील युद्धात पाकिस्तानला धुळ चारली. या युद्धाचा अनुभव लक्षात घेता.

भारताने स्वतःचे जीपीएस म्हणजेच नाविक बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच सीडीएस पदाची निर्मिती करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला.

मोठ्या अपत्कालिन परिस्थितीत किंवा देशाच्या संरक्षणासाठी लष्कर, वायूदल, नौदल या तिघां दलांमध्ये समन्वय राहावा यासाठी सीडीएस पदाची निर्मिती करण्याची शिफारस करण्यात आली.
या पदाच्या निर्मितीच्या चर्चेवेळी काहींनी त्याला विरोधही केला. विरोध करणाऱ्या लोकांचे मत असे होते की, आपल्या देशाचे संरक्षण दलात एवढी मोठी पोस्ट बनवण्याची गरज नाही. आपल्या देशाचे विविध खंडावर बेस नाही.

तसेच, एवढ्या मोठ्या पदाची निर्मिती केल्यानंतर लष्करी बंडाचीही भीती काहींनी व्यक्त केली. आपल्या देशाच्या जवळ असलेल्या अफगानिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश, म्यानमारादी देशांमध्ये असे बंड घडून आले आहेत.

पहिले सीडीएस
हे पद निर्माण करण्यासाठी 20 वर्षे वाट पाहावी लागली. 4 स्टार रॅंकिंगचं हे पद आहे. डिसेंबर 2019 देशाचे पहिले सीडीएस म्हणून बिपीन रावत यांची नियुक्ती झाली.

नियुक्ती
CDS यांची नियुक्ती तीन वर्षासाठी किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत (जे आधी येईल ते ) करता येते. सीडीएस यांना दोन आघाड्यांवर काम करायचे असते. एक म्हणजे शासकीय पातळीवर आणि दुसरे म्हणजे सरंक्षण दलाच्या पातळीवर समन्वय साधणे.

सीडीएस यांची नियुक्ती appointment Committee of cabinet करीत असते. या समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. समितीने शिफारस केलेल्या सीडीएसची नियुक्ती राष्ट्रपतींमार्फत करण्यात येते.

अधिकार
सीडीएस यांच्यासाठी सरंक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत DEPARTMENT OF MILITARY AFFAIRS निर्माण करण्यात आले. म्हणजेच हा विभाग सरंक्षण मंत्रालयाच्या मुख्य सचिवांच्या अधिकारात येतो. त्यामुळे सीडीएस यांना सर्वोच्च अधिकार नाही.

परंतु , सैन्याशी संबधित सर्व महत्वाचे अधिकार, लष्करी तळाशी संबधित विषय, रणनिती, तिन्ही दलांचा समन्वय, शस्त्रांच्या संदर्भात निर्णय घेणे. हे सीडीएस यांचे काम असेल.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!