४४.८६ लक्ष निधीतून शेगांव प्रभागातील रस्त्यांना येणार नवी चकाकी , मूलभूत सुविधांच्या विकास कामांचे आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते भूमिपूजन,नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास सर्वोतोपरी प्राधान्य-आ. सुलभाताई खोडके.

अमरावती १७ ऑक्टोबर: अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील शेगांव प्रभाग क्रमांक १ मधील विविध नगरांमध्ये विविध रस्ते विकासा करिता मूलभूत सोयी सुविधा विकास निधी या शीर्षाखाली आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी ४४.८६ लक्ष इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. रविवार १७ ऑक्टोबर २०२१ रोजी या विविध रस्ते विकासकामांचे भूमिपूजन आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले.
निवडणूकपूर्व काळात केलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासह विकासाच्या नियोजित कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याला घेऊन अमरावतीच्या आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी कामकाजाचा सपाटा सुरू केला आहे. कोरोनाच्या काळातही तत्पर व सक्रिय राहून आमदार महोदयांनी शहराच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने अमरावतीत विकास पर्व नांदत आहे.विकासाच्या याच शृंखलेत अमरावती महानगर पालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा या शीर्षाखाली शेगाव प्रभागासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ४४.८६ लक्ष इतक्या निधीपैकी ७.५४ लक्ष निधीतून कलोती नगर ,उर्वशी नगरातील रस्त्यांचे डांबरीकरण होणार आहे. तर रुपये ६.३७ लक्ष निधीतून विठाई नगरातील रस्ता कात टाकणार आहे. तसेच ३०.९५ लक्ष निधीतून स्वावलंबी नगरातील मुख्य रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.
या तीनही रस्ते विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण करीत आ. सौ .सुलभाताई खोडके यांनी कुदळ मारीत भूमीपूजनाची औपचारिकता साधली. यावेळी आमदार महोदयांनी निवेदनांचा स्विकार करीत स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शहरातील प्रभागा-प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासह नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपले सर्वोतोपरी प्राधान्य राहणार असल्याचा विश्वास आ .सुलभाताई खोडके यांनी याप्रसंगी व्यक्त केला. शेंगाव प्रभागातील नगरांमध्ये रस्ते विकासासाठी ४४.८६ लक्ष निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक नागरिकांद्वारे आमदार महोदयांचे स्वागत तसेच आभार मानीत अभिनंदन करण्यात आले.
यावेळी आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे समवेत राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, नगरसेवक प्रशांत डवरे,माजी नगरसेवक प्रवीण मेश्राम, रवींद्र इंगोले, सचिन वाडेकर, रत्नदीप बागडे, यश खोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता व्हि.बी. बोरसे, शाखा अभियंता अनिल भटकर, सहाय्यक अभियंता स्वप्निल तालन, प्रशांत धर्माळे, साहेबराव सियाले, राजाभाऊ सांगोले ,प्रशांत काळबांडे, ऍड. सुनील बोळे, शरद वानखडे,प्रमोद महल्ले, योगेश सवाई, राजेश कोरडे, नाना पानसरे, पिंटू मानकर, दत्तात्रय बागल, राजेंद्र कुर्हेकर, बंडू निंभोरकर, प्रशांत पेठे, प्रवीण भोरे, श्री. गवते, नंदीनी गुडधे, कल्पना वानखडे, शिल्पा देशमुख, वर्षा रजाने, सविता कोहळे, प्रतिभा ठाकरे, वर्षा घोगरे, सिमा चाैधरी, विभा थोटे, कविता गिरी, सारिका हाडोळे, प्रतिमा ठाकरे, वैशाली हाडोळे, प्रिती पवार, लिला चारथळ, मिना चारथळ, तुप्ती मानकर, वर्षा चाैधरी, पल्लवी सगणे, बबलु वाडेकर, रविंद्र इंगोले, प्रभाकर देशमुख, गोविंद खंडेझोड, गजानन पाटनकर, संजय देशमुख, राहुल खंडेझोड, अनिल तायडे, दिलीप मुळे, बाल्या देशमुख, लक्ष्मण वाडेकर, किशोर वानखडे, रामदास धोंडे, देवेंद्र लव्हाळे, गजानन गवळी, अक्षय ढवळे, तेजस बोरकर, विकास वानखडे, श्रीकृष्ण काळे, प्रशांत ताथोडे, अमित पडोळे, प्रकाश कडु, मंगेश जांभुळकर, प्रकाश कडु, रविंद्र दळवी, सुधिर हरणे, गजानन बरवट, विनायक तायडे, अशोक राऊत, सुनिल देशमुख, प्रकाश काळे, सुनिल तायडे, दिगंबर वाघ, सुनिल मांजरे, विलास देठे, अशोक उमक, प्रशांत ताथोडे, प्रदिप यावले, भुषण राऊत, भैय्यासाहेब देशमुख, भरतराव देशमुख, नारायण साखरकर, प्रभाकर पडोळे, विजय काळबांडे, अमित सोळंके, शुभम तायडे, चरणदास ढवळे, मिलिंद खंडारे, सुशांत विंचुरकर, अमोल भाकरे, प्रमोद शेळके, संजय गुलवाडे, जगन्नाथ तायडे, विनोद पेढेकर, प्रमोद पेढेकर, नारायण सुरंजसे, गजानन पातोंड, गजानन गवळी, गोपाल भोजने, निलेश भेटाळु, विस्मय ठाकरे, रामभाऊ थोटे, पंडीत वडे, नरेंद्र आवारे, सचिन सगणे, गिरिष घोगरे, विवेक मानकर, भोजराज कोहळे, राजेश चाैधरी, सुनिल गिरी, विवेक तोटे, सुरेश चाैधरी, संदीप हाडोळे, क्षितिज मोहोड, सुरेंद्र हाडोळे, शैलेश मांदळे, अनिल तायडे, विलास थोटे, विनोद चारथळ, विवेक मानकर, राजेश चाैधरी, शिसराम मिना, शंकरराव माळोदे, आदि सहित कलोती नगर – उर्वशी नगर, विठाई नगर – स्वालंबी नगर येथील जेष्ठ नागरीक, महिला भगिनि व युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

रवि मारोटकर महाराष्ट्र ब्युरो चीफ