जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या भाैतीक सुविधा व यंत्रणांच्या कामांसाठी ६.४५ कोटींचा निधी प्राप्त

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या भाैतीक सुविधा व यंत्रणांच्या कामांसाठी ६.४५ कोटींचा निधी प्राप्त
अद्यावत कामांना गती देण्याला घेवुन आ.साै. सुलभाताई खोडके यांची पाहणी
200 खाटांचे नुतन रुग्णालय कार्यान्वयीत होण्याचा मार्ग प्रशस्त

अमरावती १६ ऑक्टोबर :  अमरावती स्थित जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 200 खाटांच्या नविन इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असतांना तेथील भैतीक सुविधा व अध्यावर यंत्रणांच्या कामासाठी आ. साै. सुलभाताई खोडके यांनी गेल्या 5 जुलै 2021 रोजीच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीत 6 कोटी 45 लक्ष 69 हजारांचा निधी मंजुर करुन घेतला होता. सदर निधी आता कोषागार कार्यालयात जमा झाला आहे. या निधीच्या मुख्य नियोजनातुन रुग्णालयाच्या कामांना गती देत तसेच लवकरात लवकर रुग्णालय जनतेच्या सेवेत कार्यान्वित करण्याला घेवुन आ. साै. सुलभाताई खोडके यांनी 16 आॅक्टोंबर 2021 रोजी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी जावुन पाहणी केली.

 जिल्हा स्त्री रुग्णालय हे जिल्ह्यातील गर्भवती महिला , प्रसूत माता व नवजात बालकांसाठी आरोग्य संजीवनी असून याठिकाणी केवळ अमरावतीच नव्हे तर धारणी , मेळघाट तसेच मध्यप्रदेशाच्या सीमा भागातून महिला उपचारासाठी येत असतात. त्यामुळे डफरीनच्या जुन्या इमारतीत एवढा मोठा डोलारा सांभाळणे अवघड झाले असल्याने आ. सुलभाताई खोडके यांनी सदर रुग्णालय निर्माणाधीन नूतन इमारतीत लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्नांची मालीकाच राबविलेली आहे.


आ. सुलभाताई खोडके यांच्या प्रयत्नाने आतापर्यंत प्राप्त निधी अंतर्गत स्थापत्य कामां सोबतच विद्युतीकरण, अग्नीशमन व्यवस्थांची कामे तसेच वातानुकुलीत यंत्रणेची कामे प्रगतीपथावर आली असुन अन्य भैातिक सुविधांच्या कामांनी देखील चांगलाच वेग धरला आहे. अशातच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 200 खाटांच्या निर्माणाधीन इमारतीत अद्यावत अश्या मेडीकल गॅस पाईप, सोलर वाॅटर हिटर, रुफ टाॅप प्लाॅट, सिसिटिव्ही कॅमेरे इत्यादी कामे पुर्णत्वास आणण्याकरीता आ. साै. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे निधीला घेवुन पाठपुरावा केला असता त्याअनुषंगाने गेल्या 5 जुलै 2021 रोजी झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवनी मागणीत 6 कोटी 45 लक्ष 69 हजारांचा निधी मंजुर करण्यात आला. तसेच सदर रकमेच्या अंदाज पत्रक व आराखड्यासहीत प्रशाकीय मान्यता देण्यात आली. अशातच आता आॅक्टोंबर महिन्यात सदर निधी जिल्हा कोषागार मध्ये जमा करण्यात आला आहे. या निधीत जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नुतन इमारतीत मेडीकल गॅस पाईप लाईन, यंत्रणा शुगर वाॅटर हिटर, रुफ टाॅप प्लाॅट, सिसिटिव्ही इत्यादी कामे पुर्णत्वास आणण्यासाठी आ. साै. सुलभाताई खोडके यांनी बांधकाम स्थळी जावुन प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला. यावेळी आमदार महोदयांनी रुग्णालयाच्या प्रगतीपथावरील कामांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच आता भैातीक सुविधा व विविध यंत्रणांच्या कामांना गती देण्याला घेवुन सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने कार्यरत रहावे व ही कामे नियोजीत वेळेत पुर्ण करण्याची सुचना केली.

सध्या कोरोनाचे संक्रमण कमी झाले असले तरी साथ मात्र कायम आहे. त्यामुळे संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करण्यासह दिर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय नुतन ईमारतीत लवकरात लवकर कसे कार्यन्वीत करता येईल, या साठी संबंधीत यंत्रणांनी सुसंवाद व समन्वय ठेवुन व आपल्या सामाजीक जबाबदारीचे भान राखुन तत्पर भुमिका घ्यावी असे आवाहन आ. साै. सुलभाताई खोडके यांनी केले. या प्रसंगी आ. साै. सुलभाताई खोडके यांचे समवेत राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डाॅ. विद्या वाठोडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. थोटांगे, शाखा अभियंता प्रकाश एन. रेड्डी, उपअभियंता (विद्युत) व्हि.एन. दारव्हेकर, यश खोडके, ऋषिकेश गभने,  एम.पी. इलेकट्रीकल्स चे प्रतिनिधी  शेरु भाई खाॅ, साईड इंजीनीअर प्रमोद पेठे, प्रमोद पोकळे, आदी उपस्थित होते.


BOXजिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथील  दोनशे खाटांचे  नूतन इमारत बांधकामाचे अंदाजपत्रक हे सन 2012 – 13 च्या अमरावती विभागाच्या दरसूची वर आधारित आहे सदर दरसूची नुसार रुपये 45 कोटी 61 लाख 58 हजार एवढ्या रकमेच्या अंदाज व आराखड्याला शासनाच्या 12 एप्रिल 2013 च्या पत्रान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली. वर्ष 2013 ते 2019 या 7 वर्षाच्या काळात केवळ 14 कोटीच निधी उपलब्ध होऊ शकला. मात्र आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी आपल्या सुरुवातीच्या दोन वर्षाच्या काळातच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 200 खाटांचे नूतन इमारती साठी तब्बल 33 कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला हे विशेष
रवि मारोटकर महाराष्ट्र ब्युरो चीफ

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!