प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम:-डिस्टिक ऐमचोर स्पोर्ट्स कराटे डू असोसिएशन अमरावती यूथ स्पोर्ट्स डेव्हलपमेंट मल्टीपर्पज असोसिएशन अमरावती यांच्या विद्यमाने सेकंड डिस्टिक सिलेक्शन कराटे डू चॅम्पियनशिप 2021 पार पडली यामध्ये अमरावती जिल्ह्यातील व संपूर्ण विदर्भातील मुले मुली मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथून कराटे चॅम्पियन कुमारी मयुरी गुप्ता हिनी सुद्धा सहभाग घेतला होता. यामध्ये तिला दुसऱ्या क्रमांकाचे सिल्वर मेडल प्राप्त झाले प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.या यशाबद्दल कराटे चॅम्पियन कुमारी मयुरी गुप्ता ही ज्या वाशिम जिल्हा व कारंजा लाड येथून त्यांचा परिवार व मित्र मंडळ यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व कराटे चॅम्पियन मयुरी गुप्ता हिने सुद्धा सर्व जनतेचे आभार मानले व सर्व मुलींना असे आवाहन केले की सर्वांनी कराटेचे प्रशिक्षण घेऊन या खेळा मध्ये यावे त्यामुळे स्वतःचे रक्षण पण होईल व व्यायाम होऊन आरोग्य सुद्धा चांगली राहील व आपल्या गावाचे जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे नाव रोशन होईल असे मनोगत कराटे चॅम्पियन कुमारी मयुरी गुप्ता हीने व्यक्त केले.
