भाकपच्या वतिने वाशिम येथे दलित अधिकार सभा संपन्न

१८,१९ डिसेंबर रोजी औरंगाबाद येथे राष्ट्रीय अधिवेशन

प्रतिनिधी फुलचंद भगत:-


वाशिम:भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) जिल्हा कौंसिल च्या वतीने
ऑल इंडिया दलित राईटस् मुव्हमेंट AIDRM(अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन संमेलन सभा आणि जिल्हा कौंसिलची विस्तारित सभा मंगळवार , दि .९ डिसेंबर २०२१ दुपारी १ वाजता श्रमिक उर्जा भवन, काटा रोड वाशिम येथे संपन्न झाली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश मुंजे हे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, ॲड महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे अमरावती विभागीय संपर्कप्रमुख संजय मंडवधरे,वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख भीमराव गवई यांनी सभेत मार्गदर्शन केले.


औरंगाबाद येथे आयोजित अखिल भारतीय दलित अधिकार अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या तयारीसाठी ही सभा घेण्यात आली.राष्ट्रीय अधिवेशनात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. डी. राजा, कॉ. जानकी पासवान यांच्यासह देशभरातून प्रतिनिधी येणार आहेत.
भारतीय शेतमजूर युनियन, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन, अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने १८ व १९ डिसेंबर २०२१ रोजी औरंगाबाद येथे राष्ट्रीय दलित अधिकार अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्‌घाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कॉ. डी. राजा यांच्या हस्ते होणार असून, अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे राष्ट्रीय निमंत्रक कॉ. जानकी पासवान अध्यक्षस्थानी असतील. या अधिवेशनाला देशभरातील शेकडो प्रतिनिधी उपस्थित राहणार राहणार आहे.


उद्‌घाटनप्रसंगी भारतीय शेतमजूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष पेरिया सामी (तामिळनाडू), महासचिव कॉ. गुलजारसिंग गोरिया, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. भालचंद्र कानगो, राज्यसचिव कॉ. तुकाराम भस्मे, अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाचे राज्य निमंत्रक कॉ. शिवकुमार गणवीर, लालबावटा शेतमजूर युनियनचे राज्याध्यक्ष कॉ. नामदेव चव्हाण आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


समता मिरवणुकीने प्रारंभ उद्‌घाटन सत्र सर्वांसाठी खुले राहणार असून, समता मिरवणुकीने याची सुरुवात होईल. समता मिरवणुकीस व उद्‌घाटनाच्या खुल्या सत्रास आंबेडकरवादी, डाव्या, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष पक्ष – संघटनाच्या कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच परिसंवाद, पुस्तिका, स्मरणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे.


बुद्धप्रिय कबीर नगर औरंगाबाद येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या या अधिवेशन स्थळास औरंगाबादेतील दलित अत्याचारविरोधी संघर्ष समितीचे धडाडीचे कार्यकर्ते दिवंगत बुद्धप्रिय कबीर यांच्या स्मरणार्थ “बुद्धप्रिय कबीर नगर’ असे नाव देण्यात आले आहे अमरावती येथे संपन्न झालेल्या जिल्हा सभेत जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते व जिल्हा कमेटी सदस्य उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने रमेश खिल्लारे, मंगेश इंगळे, संजय अभोरे, सुखदेव खिराडे, देवराव कांबळे,वसंता डोंगरदिवे, प्रल्हाद पौळकर इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!