रवी मारोटकर ब्युरो चीफ
नांदगाव नगरपंचायत निवडणूक रद्द होण्यास मुख्याधिकारी जबाबदार
विशिष्ट राजकिय पक्षाला फेर आरक्षणाचा फटका म्हणून खटाटोप , युवा सेनेचे प्रकाश मारोटकर यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक रद्द होण्यास मुख्याधिकारी यादव जबाबदार असून फेर आरक्षण सोडतीचा मुख्याधिरी यांच्या मर्जीतील विशिष्ट राजकीय पक्षाला फटका बसल्यामुळे प्रभाग रचनेच्या सिमा व वर्णनात विसंगत असल्याचे पत्र मुख्याधिकारी यांनी राजकीय दबावाखाली निवडणूक आयोगास पाठविल्यामुळे निवडणूक रद्द झाल्याचा आरोप करीत युवा सेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी निवडणूक आयोगा व विभागीय आयुक्त यांचेकडे तक्रार करून मुख्यधिकारी यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी केली .
नांदगाव नगरपंचायतची मुदत संपून एक वर्षाचा कालावधी झाला असून प्रशासकांच्या देखरेखीखाली कारभार सुरू आहे फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणूक रद्द झाली होती मात्र आता निवडणूक आयोगाने ११३ नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला, त्यात नांदगाव न प ची निवडणूकिला आयोगाने स्थगिती दिली आहे, आयोगाने आयोगाने सार्वत्रिक नगर पंचायत निवडणुकीत नांदगावचा सुद्धा समावेश होता परंतु मुख्याधिकारी यांनी २२ नोव्हेंबर रोजी शासनाच्या राजपत्रात व प्रभाग रचनेतील मराठी व इंग्रजी मध्ये विसंगती असून प्रभाग रचनेच्या दिशामध्ये त्याचं सीमेची पुनरावृत्ती झाल्याचे पत्र निवडणूक आयोगास पाठवून निवडणूक घेणे सयुक्तिक होणार नसल्याचे कळविले
मात्र सदर चुका ह्या लेखाकणाच्या असून फक्त तीन प्रभागामध्ये अशी विसंगत दिसून येत असल्याचा आरोप प्रकाश मारोटकर यांनी करीत सदर बाब फेब्रुवारी २०२१ च्या निवडणूक कार्यक्रम दरम्यान मुख्याधिकारी यादव यांचे निदर्शनास आली असतांना तब्बल नऊ महिन्याच्या कालावधी नंतर हि बाब निवडणूक आयोगास कळविणे ही गंभीर बाब असून आयोगाची दिशाभूल केली आहे, वास्तविक सन २०१५ ची निवडणूक याच राजपत्र व प्रभाग रचनेनुसार पार पाडून सभागृहाने कार्यकाल सुद्धा पार पडला असून यावर सन २०१५,२०२० च्या राजपत्रावर आक्षेप नसतांना मुख्याधिकारी यांनी हेतुपुरस्पर हि बाब आयोगापासून नऊ महिने लपवली आहे त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करून मुख्याधिकारी यांचेवर निलंबनाची कार्यवाही करावी व फेर आरक्षण सोडतिचे आरक्षण कायम ठेवावे अशी तक्रार प्रकाश मारोटकर यांनी निवडणूक आयोग व विभागीय आयुक्त यांचेकडे केली आहे
फेर आरक्षणाचा विशिष्ट राजकीय पक्षाला फटका