वंचित बहुजन आघाडी,महिला आघाडी व युवा आघाडी,चांदूर रेल्वे यांच्या वतीने विश्वरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी त्यांना विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव प्रा.रवींद्र मेंढे,प्रमुख अतिथी म्हणून महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा बेबीनंदा लांडगे उपस्थित होते.यावेळी मनोहर बठे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर प्रा.रवींद्र मेंढे,बेबीनंदा लांडगे,माजी तालुका कार्य.सदस्य अनिल इंगोले,महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष हिरू मेंढे,सचिव अनिता धवणे,शहर सचिव सविता फुलझेले,नरेंद्र सहारे,राहुल खोडे,ऋषीकेश बठे,वैभव निमरट यांसह अनेकांनी महामानवास विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहली.यावेळी प्रा.रवींद्र मेंढे व बेबीनंदा लांडगे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी,महिला आघाडी व युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.