शेतकरी, शेतमजूर व सामान्य लोकांच्या समस्यासाठी वडनेर गंगाई येथे दिपक आठवले यांचे धरणे आंदोलन.

दर्यापूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा सदस्य ग्रामपंचायत वडनेर गंगाई सागर माधवराव देशमुख यांचा जाहीर पाठींबा

दर्यापूर – महेश शेतकरी, शेतमजूर व सामान्य लोकांच्या समस्यासाठी वडनेर गंगाई येथे दिपक आठवले यांचे धरणे आंदोलन.

प्रतिनिधी महेश बुंदे

तालुक्यातील वडनेर गंगाई येथे २ डिसेंबर २०२१ पासून वडनेर गंगाई येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक आठवले हे आपल्या समर्थकांसह गावातील शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, सामान्य लोकांसाठी, घरकुल लाभार्थी, विद्युत धारक ह्या संदर्भात गावातील लोकांच्या भरपूर समस्या आहेत. यावर्षी निसर्गाच्या लहरपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यात वडनेर मंडळ लाभापासुन वंचित ठेवले आहे. बऱ्याच लोकांच्या घरकुलाच्या समस्या आहेत. गावामध्ये अनेक लोकांवर अव्वाच्या सव्वा विजबील आहेत. अश्या ऐक ना अनेक समस्या गावामध्ये आहेत. त्या गावातील लोकांच्या समस्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी गावातील एक तरुण समाजसेवक या सर्व घटकातील लोकांच्या मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहे.

या सर्व समस्यांच लवकरात लवकर निराकरण करावे. अशी मागणी संपूर्ण गावाकडून होत आहे. या धरणे आंदोलनाला दर्यापूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा सदस्य ग्रामपंचायत वडनेर गंगाई सागर माधवराव देशमुख व सर्व मित्रपरिवार यांनी आपला जाहीर पाठींबा दिला आहे. यावेळी दिनकरराव देशमुख भगवानराव वानखडे रामदासराव रेठे श्रीकृष्णराव वानखडे सुधाकरराव वानखडे सुभाषराव कोथळकर शोहेबउल्ला खान सत्याविजय वानखडे शामभाऊ वानखडे विनायकराव खडे शरद वानखडे ऋषिकेश शेंगोकार धर्माजी वानखडे रोहित काळे निशांत कोथळकर गौरव बोंद्रे पिंटू वानखडे इत्यादी गावातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!