प्रतिनिधी नीरज शेळके
ठाणे : राष्ट्रीय युवा दिवसाचं’ औचित्य साधत, येत्या 11 आणि 12 जानेवारी 2022 रोजी, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ‘युवाशक्ती’ समितीतर्फे ठाण्यात राज्यस्तरीय ‘युवा साहित्य सम्मेलन’ आयोजित करण्यात येत आहे. सदर संमेलन ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह इथं सम्पन्न होत आहे .

प्रसिद्ध युवा साहित्यिक सुश्री. प्रणव सखदेव ह्यांनी सदर सम्मेलनाचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के हे या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद भूषवतील. तसेच उदघाटन पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे पालक मंत्री ठाणे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत राज्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत..
वयाच्या नव्वदाव्या वर्षीही तरुणांच्या उत्साहाने कार्यरत असलेले कोमसापचे संस्थापक, पद्मश्री सम्मानाने गौरवित, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक ह्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन, कोमसाप कार्याध्यक्षा नमिता कीर आणि प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संमेलन सम्पन्न होणार आहे.

आजच्या तरुणांची आपल्या मातृभाषेशी, विविध साहित्यप्रकारांशी, कलेशी आणि त्यांच्या भवतालाशी कश्याप्रकारे नाळ जुळलेली आहे. या सर्वांमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. पण त्यांच्यासाठी काही ठोस व्यासपीठ देणे आवश्यक असते. त्याकरता हे युवसाहित्य संमलेन आयोजित करण्यात आले आहे.
