जिल्हा अध्यक्ष श्री बबलू भाऊ देशमुख यांची उपस्थिती
दर्यापूर – महेश बुंदे
अमरावती जिल्हा सहकारी बँक निवडणूक पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर व जिल्हा परिषद अध्यक्ष तथा काँग्रेस नेते अनिरुद्ध उर्फ बबलू भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे नवनिर्वाचित तेरा संचालक निवडणूक आले व या सर्व संचालकांचा जाहीर सत्कार तालुका काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांनी शुभम मंगल कार्यालयात आयोजित केला असता जिल्हा परिषद अध्यक्ष काँग्रेस नेते श्री बबलू भाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तर आमदार श्री बळवंत वानखडे व जिल्हा परिषद आरोग्य व वित्त सभापती श्री बाळासाहेब हिंगणिकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला,.

सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन तथा माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा बँक अध्यक्ष श्री सुधाकर पाटील भारसाकळे यांनी सर्वांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रास्तविक सुधाकर भाऊ भारसाकळे यांनी आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत सादर केले त्यानंतर बाळासाहेब हिंगणिकर, सुनील वऱ्हाडे, सुरेखा ताई ठाकरे, बळवंत वानखडे, जेष्ठ संचालक नरेंश्चंद्र ठाकरे, श्री बबलू देशमुख यांनी मार्गदर्शन पर भाषण केले. त्याप्रसंगी व्यासपीठावर पूजा ताई आमले, मोनिका ताई मार्डीकर, हरिभाऊ मोहोड, प्रकाश भाऊ काळ पांडे, बाळासाहेब अलोने, दयाराम काळे, संजय मार्डीकर, उपस्थित होते.

शुभम मंगल कार्यालय सभागृहात प्रेक्षकांनी फुलून गेले होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भारसाकळे तर आभार ऍड अभिजित देवके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ईश्वर बुंदेले, रफिक सय्यद, दत्ता कुंभारकर, संदीप गावंडे, पवन पाचपोर, निशिकांत पाखरे, इरफान इनामदार, जम्मू भाई पठाण, आदींनी परिक्षम घेतले.
