प्रतिनिधी :- कुणाल शिंदे सह लहू लांडे, पुणे
भानोबा हे नवनाथ पंथींचे जागरुक देवस्थान मानले जाते,तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले भाविक युद्धाचा थरार अनुभवतात .मार्गशिर्ष प्रतिपदेला भानोबा मंदिरासमोरील पटांगणात देव-दानवांच्या युद्धाचा थरार अनुभवलायला मिळतो.
खेड तालुक्यातील श्री क्षेत्र कोयाळी गावात सालाबादप्रमाणे दिनांक 5 डिसेंबर 2021 ते 7 डिसेंबर 2021 रोजी नुकतीच भानोबाची यात्रा पार पडली. भानोबा देवाची यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे.भानोबा देवाच्या यात्रेनिमित्त देवाचा अभिषेक, ओलांडा, ओव्या ,छबिना सोहळा, पोवाडा, विविध धार्मिक कार्यक्रम, आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असल्याने अवघा परिसर भक्तिरसात चिंब झाला आहे.
ढोल-ताशांचा गजर आणि ‘भानोबाच्या नावानं चांगभलं’, असा उद्घोष करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन हजारो भाविक या यात्रेत सहभागी होतात. देव-दानवांच्या युद्धाचे
देव-दानवांमध्ये रंगलेले हे युद्ध पाहण्यासाठी, तसेच श्री भानोबाच्या दर्शनासाठी दोन दिवसांत हजारो भाविकांनी हजेरी लावली.
तत्पूर्वी पहाटे श्री भानोबादेवाची विधिवत अभिषेक व पूजा करण्यात आली.त्यानंतर देवाचा पोवाडा घेण्यात आला.सकाळी साडेअकरा ते एक या वेळेत देव-दानव युद्ध झाले, दोन दिवसांत एकूण १ हजार चारशे भाविकांनी या युद्धात सहभाग घेतला.भानोबा देवाची महाआरती घेऊन देवाच्या दर्शनाला दर्शनबारीतून सुरुवात झाली.
हा उत्सव पार पडण्यासाठी कोयाळी-भानोबाच्या देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी,सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील विविध मंडळे, संस्था, तरुण वर्ग तसेच सर्व ग्रामस्थांचे मोठे योगदान लाभले, यात्रे दरम्यान पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, व आळंदी पोलीस ठाण्याअंतर्गत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
