प्रतिनिधी फुलचंद भगत :-
पेन्शन यात्रेत वाशिम जिल्ह्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाशिम:-दिनांक 4 डिसेंबर रोजी जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचं वाशिम जिल्हयात जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.रात्री १०:०० वाजता संघर्ष यात्रेचं कारंजा शहरात आगमन झाले, कडाक्याच्या थंडीतही शेकडोंच्या संख्येने डीसीपीएस/एनपीस धारक , समन्वय समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जुनी पेन्शनच्या व्यासपीठावर संघटनेचे राज्याध्यक्ष नितेश खांडेकर,राज्यसचिव गोविंद उगले,जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती राज्य निमंत्रक मधुकर काठोळे,कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे,आशुतोष चौधरी,राज्य सल्लागार सुनिल दुधे,विभागीय अध्यक्ष मिलींद सोळंके ,रामदास जिल्हाध्यक्ष अकोला ,जिल्हाध्यक्ष निलेश कानडे उपस्थित होते.तसेच जुनी पेन्शन संघर्ष जिल्हा समन्वय समितीचे मधुकर महाले,विजय सोनुने ,राजु मते, सतिष सांगळे,विजय मनवर,नितीन काळे,गजेंद्र उगले, राहुल वरघट ,इरफान मिर्झा,विनोद मनवर प्रविण म्हतारमारे,अमर शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यसचिव गोविंद उगले यांनी डीसीपीएस एनपीएस धारकांनी शासनविरोधात पेटुन उठण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.तसेच राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी संघर्ष यात्रेची आवश्यकता का होती? हे उपस्थितांना पटवून दिले.महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिलेदारांच्या पाठिंब्यावर येणाऱ्या काळात शासनाविरोधात जुनी पेन्शन साठी ‘आर या पार’ ची लढाई लढणार असल्याचे खांडेकर यांनी सांगितले.तसेच स्वतातंत्र्यानंतर देशातल्या राजधानीत वर्षभर चाललेलं शेतकरी आंदोलन , महाराष्ट्रात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप या आंदोलनापासुन आपण प्रेरणा घेऊन जुनी पेन्शनचेही भविष्यातील आंदोलनं अशाच प्रकारची असतील असे वितेश खांडेकर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
जुनी पेंशन जिल्हा समन्वय समिती पदाधिकारी यांचेही स्वागत जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने करण्यात आले.
