हिवाळी अधिवेशनावर निघणाऱ्या ‘पेन्शनमार्च’ची लवकरच घोषणा करणार-वितेश खांडेकर

प्रतिनिधी फुलचंद भगत :-


वाशिम:-दिनांक 4 डिसेंबर रोजी जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचं वाशिम जिल्हयात जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.रात्री १०:०० वाजता संघर्ष यात्रेचं कारंजा शहरात आगमन झाले, कडाक्याच्या थंडीतही शेकडोंच्या संख्येने डीसीपीएस/एनपीस धारक , समन्वय समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जुनी पेन्शनच्या व्यासपीठावर संघटनेचे राज्याध्यक्ष नितेश खांडेकर,राज्यसचिव गोविंद उगले,जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती राज्य निमंत्रक मधुकर काठोळे,कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे,आशुतोष चौधरी,राज्य सल्लागार सुनिल दुधे,विभागीय अध्यक्ष मिलींद सोळंके ,रामदास जिल्हाध्यक्ष अकोला ,जिल्हाध्यक्ष निलेश कानडे उपस्थित होते.तसेच जुनी पेन्शन संघर्ष जिल्हा समन्वय समितीचे मधुकर महाले,विजय सोनुने ,राजु मते, सतिष सांगळे,विजय मनवर,नितीन काळे,गजेंद्र उगले, राहुल वरघट ,इरफान मिर्झा,विनोद मनवर प्रविण म्हतारमारे,अमर शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.


राज्यसचिव गोविंद उगले यांनी डीसीपीएस एनपीएस धारकांनी शासनविरोधात पेटुन उठण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.तसेच राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी संघर्ष यात्रेची आवश्यकता का होती? हे उपस्थितांना पटवून दिले.महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिलेदारांच्या पाठिंब्यावर येणाऱ्या काळात शासनाविरोधात जुनी पेन्शन साठी ‘आर या पार’ ची लढाई लढणार असल्याचे खांडेकर यांनी सांगितले.तसेच स्वतातंत्र्यानंतर देशातल्या राजधानीत वर्षभर चाललेलं शेतकरी आंदोलन , महाराष्ट्रात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप या आंदोलनापासुन आपण प्रेरणा घेऊन जुनी पेन्शनचेही नवीन आंदोलनं करणार,तसेच मुंबई अधिवेशनावर लवकरच पेन्शनमार्चची घोषणा करणार असल्याचे वितेश खांडेकर सांगितले.
जुनी पेंशन जिल्हा समन्वय समिती पदाधिकारी यांचेही स्वागत जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद काळबांडे,गोपाल लोखंडे सचिन सवडतकर ,सतिष शिंदे ,निलेश मोरे,मीलींद इंगळे,कैलास वानखेडे ,बालाजी फताटे, गोविंद पोतदार,संदिप महाले ,निलेश म्हतारमारे, रवि ठाकरे,गणेश राऊत,अनीकेत जिरापुरे,अनुप डहाके , श्रीपाद शिंदे,अंगद जाधव,अमोल सावके,चंद्रमणी इंगोले प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी मोटे तर आभार प्रदर्शन श्रीकांत बोरचाटे यांनी केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!