मुंबई देशाची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ह्या बहुरंगी, बहुढंगी शहराने सांस्कृतिक विविधताही जपली आहे. भारताचे प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहराने कलात्मक वारसाही जपला आहे. भारताचे प्रवेशद्वार 20 व्या शतकात बांधले गेलेले एक महत्त्वाचे स्मारक आहे
वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेले गेट वे ऑफ इंडिया त्यातीलच एक. इंग्लंडचा राजा पाचवा जॉर्ज यांच्या १९११ सालच्या ऐतिहासिक भेटी स्मरणार्थ हे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. जॉर्ज यांच्या स्वागतासाठी त्यावेळच्या अपोलो बंदराच्या पायथ्याशी मोगलाई थाटाचा तात्पुरता मंडप उभारण्यात आला होता.
भेटीच्या स्मृती कायम स्वरूपी जपण्यासाठी स्मारक उभारण्याची योजना आखण्यात आली. जॉर्ज विट्टे या वास्तुविशारदाच्या कल्पनेतून साकार झालेली ती वास्तु म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया. हे ४ डिसेंबर १९२४ साली लोकांसाठी खुले करण्यात आले. गेटवे ऑफ इंडिया सोळाव्या शतकातील गुजराती धर्तीच्या शिल्पकेलेचा उत्कृष्ट नमुना आहे. पिवळ्या बसातर दगडात ह्या वास्तूचे बांधकाम करण्यात आले आहे.
नजीकच्या ठाणे जिल्ह्यातूनच खरोदी खाणीतून हा दगड काढण्यात आला होता. वास्तूवरील घुमट व सज्जे सलोह कॉंक्रीटचे आहेत. वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे. तिच्या लांबीची एक बाजू पूर्वेकडील सागरतीराला समांतर असून या बाजूत मधोमध मोठ्या आकाराचा कमानयुक्त दरवाजा व त्यालगत दोन्ही बाजूस छोटे दरवाजे आहेत. वास्तूची मागची बाजूही सारखीच आहे. या अद्वितीय वास्तूच्या उभारणीसाठी अकरा वर्ष लागले. मुंबई म्हटले की पहिल्यांदा आठवते ते गेटवे ऑफ इंडिया. ही वास्तु ह्या वैभवशाली शहराचा मानबिंदू ठरली आहे.
मुंबईत पाय ठेवला की पर्यटकांची पहिली भेट असते ती अर्थातच गेटवे ऑफ इंडियास. गेटसमोर व बाजूच्या बागेत पर्यटक छायाचित्र काढून आपल्यासोबत स्मृती घेऊन जात असतात.
अल्पपरिचय
गेटवे ऑफ इंडिया ही दक्षिण मुंबईमधील एक इमारत आहे. १९११ मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. गेटवे ऑफ इंडिया, बॉम्बे, १९२४, गेटवे ऑफ इंडियावरील शिलालेखात असे म्हटले आहे की, “एमसीएमएक्सआय (MCMXI -रोमन अंकलेखनपद्धतीनुसार १९११) डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली दरबारी पूर्वी हे भेटीला आले होते.
याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. हिची रचना इंडो-सारासेनिक शैलीत केली गेली आहे. तीत १६ व्या शतकातील गुजराती स्थापत्यांतील काही नमुनेही आढळतात. बेसाॅल्ट दगडांनी बांधलेली ही कमान २६ मीटर (८५ फूट) उंचीची आहे.मात्र,१९११ साली या इमारतीचा नुसता आराखडा तयार झाला होता. ३१ मार्च १९१४ रोजी बाॅम्बेचे राज्यपाल सर जॉर्ज सिडेनहॅम क्लार्क यांनी गेटवे ऑफ इंडिया बांधण्यासाठी मंजुरी दिली. व बांधकाम १९१५ साली सुरू करण्यात आले.
यानंतर गेट वे ऑफ इंदडिया ही व्हिक्टोरिया राणीसाठी व बॉम्बेचे नवे राज्यपाल यांच्यासाठी भारताचे प्रतीक म्हणून वापरात आली. गेटवे ऑफ इंडिया ही इमारत दक्षिण मुंबईतील शिवाजी मार्गाच्या शेवटी अपोलो बंदर परिसरात असलेल्या वॉटरफ्रंटवर आहे..ही इमारत शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण आहे.