दर्यापूर – महेश बुंदे:-
भारतीय महाविद्यालय अमरावती येथील वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ.नितीन पट्टे हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. आजच्या या धावपळीच्य आणि कोरोनाच्या सावट्यात महाविद्यालयीन विद्यार्थी हा खूप शाळा, महाविद्यालय, शिक्षकापांसून लांब गेलेला होता. प्रवेशापासून तर परिक्षेपर्यंत ही सर्व अडथळ्याची शर्यत पार पाडताना त्याची प्रचंड दमछाक होत होती आणि वेळ प्रसंगी तो गोंधळून जात होता. अशावेळी साहजीकच तो आपल्या शिक्षकाजवळ जाऊन त्याच्या समस्या मांडत होता परंतु अनेक शिक्षक प्राध्यापक हे आपल्याच कामात व्यस्त असल्याची भासवत होते.
