Post Views: 663
राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांचा होणार भव्य सत्कार
प्रतिनिधी फुलचंद भगत:-
वाशिम:-जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन संघर्ष यात्रेचा शुभारंभ २२नोंव्हेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथुन झाला असुन त्या पेन्शन संघर्ष यात्रेचं आगमन आपल्या वाशिम जिल्ह्यात आज दिनांक ०४डिसेंबर रोजी रात्री ८:००वाजता कारंजा नगरीत आगमन होणार आहे,तरी या संघर्ष यात्रेचं स्वागत कारंजा या ठिकाणी होणार असुन राज्याध्यक्ष नितेश खांडेकर यांचा भ्रम सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी बाईक रॅली काढुन ती यात्रा पुढे अमरावती च्या दिशेने जाणार असल्याची माहिती जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली. पेन्शन संघर्ष यात्रेच्या यशस्वीतेसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे पदाधिकारी बालाजी मोटे,विनोद काळबांडे,गोपाल लोखंडे,अनिल मडके,निलेश कानडे,श्रीकांत बोराटे,रवि ठाकरे हरिदास मते,बालाजी फराटे,संदिप महाले शिवाजी नवघरे ,कैलास वानखेडे,अमोल बोडखे,निलेश म्हतारमारे,श्रीपाद शिंदे,किशोर कांबळे,सचिन सवडतकर,अमर शिंदे विशेष प्रयत्न करीत आहेत.