स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे वार्ता :- दसरा व विजयादशमीच्या मुहूर्तावर आजादी का अमृत महोत्सव या अभियानाअंतर्गत आदर्श ग्रामपंचायत टाकळकरवाडी या ठिकाणी खेड बार असोसिएशन यांचकडून कायदेविषयक शिबिराचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खेड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.देविदास युवराज शिंदे.टाकळकरवाडी गावचे नवनिर्वाचित बिनविरोध सरपंच साधनाताई टाकळकर, पोलीस पाटील आणि एडवोकेट अजय टाकळकर साहेब , ग्रामसेवक माधुरी गिरी, टाकळकरवाडी गावचे सर्व समस्त ग्रामस्थ हजर होते.

सदर कार्यक्रमास ॲड. गोपाळ शिंदे यांनी सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट स्कीम या विषयी मार्गदर्शन केले. ॲड. आशिष पाचरणे साहेब यांनी पब्लिक युटीलिटी सर्विस या विषयी , सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष देविदास शिंदे पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यामध्ये त्यांनी कायदा हा सर्वांना सारखा असतो, न्याय देताना भेदभाव केला जात नाही, त्यामुळेच कोर्टामध्ये सर्वांना सारखाच न्याय मिळतो असे प्रतिपादन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट आरती टाकळकर मॅडम हिने केले, सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एडवोकेट रोहिदास टाकळकर यांनी केले.