चाकण वार्ता :- चाकण बाजारपेठ नेहरु चौक येथील भूमीगत गटारीची योग्यप्रकारे स्वच्छता होत नसल्याने गटार अक्षरश: तुंबली असून गटारीचे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. तुंबलेल्या गटारीमुळे डासांचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. तसेच त्या पाण्याची दुर्गंधी पण खूप येत आहे. त्यामुळे या गटारीतील पाण्याचा निचरा कायमस्वरूपी करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून,व्यवसायिक दुकानदार, पथारी भाजी विक्रेते यांच्या कडून होत आहे.

याबाबत सविस्तर असे की, चाकण मधील जुना पुणे-नाशिक हायवे नेहरू चौक ,बाजारपेठ, श्री शिवाजी विद्या मंदिर शाळा येथील भूमिगत गटार , प्लास्टिक पिशव्यांनी, माती, दगडी ,मैला इत्यादी ने भरून तुंबून सांडपाणी रस्त्यावर येण्याचा प्रकार नियमित घडत असतो. त्यामुळे दुकानासमोर गटारीतील पाणी थेट रोडवर जात आहे व परिसरातील दुर्गंधी पसरली आहे.तसेच ह्या भागात पथारी व्यवसायिक ,भाजी विक्रेते पण रोडच्या कडेला बसून आपला उदरनिर्वाह चालवत असतात, या समस्ये मुळे व्यापारी, दुकान धारकांना,पथारी व्यवसायिक, व ग्राहक, ग्रामस्थ यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

सदर गटार तुंबून सांडपाणी रस्त्यावर येण्याच्या प्रकाराबाबत स्थानिक प्रशासन चाकण नगरपरिषद, संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊन, अर्ज करून तसेच तोंडी स्वरूपात तक्रार केली असूनही सांडपाण्याचे योग्य नियोजन करण्यात येत नसल्याचे व आरोग्य विभाग दुर्लक्ष करत आहे. असे दुकानदारांनी,पथारी व्यवसायिक व तेथील ग्रामस्थांनी स्वराज्य वार्ता न्यूज च्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले. सदर समस्येकडे नगरपरिषद प्रशासनाकडून त्वरित लक्ष देऊन या ठिकाणी तुंबलेले भूमीगत गटारीची जी काही आहे ती कामे करण्यात यावे. व आमची समस्या सोडवावी अशी मागणी दुकान धारकांकडून,ग्रामस्थांन कडून केली जात आहे. स्वच्छ चाकण सुंदर चाकण हे प्रत्यक्ष की कागदावरच ? हाच प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.
