पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी,आता मोबाईल अँपवरून हह्यातीचा दाखला सादर करू शकणार, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्लीः- पेन्शन धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता केंद्रीय मंत्रालयाने त्याला नवी सुविधा दिलीय. अशा पेन्शनधारकाला हयातीचा दाखला सादर करण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागणार नाही.सेवानिवृत्त आणि वृद्ध नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सरकारने चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान आणले. पेन्शनधारकांसाठी ही प्रणाली सुरू करण्यात आलीय. पेन्शनधारक आता केवळ मोबाईल अॅप वापरून हयातीचा दाखला सादर करू शकतील. या तंत्रज्ञानाच्या मदतीने केंद्र सरकारच्या सुमारे 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान ही एक ऐतिहासिक आणि दूरगामी सुधारणा

या सुविधेचा शुभारंभ करताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “जीवन प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान ही एक ऐतिहासिक आणि दूरगामी सुधारणा आहे, कारण त्याचा केवळ 68 लाख केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या जीवनावरच परिणाम होणार नाही, तर कोट्यवधी पेन्शनर्सच्या जीवनावरही परिणाम होईल. जे या विभागाच्या अधिकारक्षेत्राबाहेर येतात जसे की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO), राज्य सरकार निवृत्तीवेतनधारक इत्यादी, इतर योजना पेन्शन धारक, सरकारी, निमसरकारी योजना धारक व इतर असे कोटयावधी नागरिकांना फायदा होणार आहे.चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञान नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NIC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांनी विकसित केलेय.

तर जीवन प्रमाणपत्र (हहयातीचा दाखला) देण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागणार नाही

ज्येष्ठ नागरिकांसाठी,व इतर नागरिकांसाठी ही सुविधा अतिशय फायदेशीर आहे, कारण त्यांना जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागणार नाही. अनेक वृद्ध पेन्शनधारक आहेत, ज्यांना बायोमेट्रिक आयडीसाठी बँकेत जाऊन बोटांचे ठसे द्यावे लागतात. अनेकवेळा असे देखील होते की, फिंगरप्रिंट योग्यरित्या स्कॅन केले जात नाही, ज्यामुळे पेन्शन थांबण्याची भीती कायम असते. पेन्शन आणि पेन्शनर्स वेल्फेअर विभागाने ट्विटद्वारे चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल सांगितले. या प्रणालीचे फायदे, आवश्यक निकष आणि प्रक्रिया ट्विटमध्येच सांगण्यात आलीय. ही संपूर्ण यंत्रणा UIDAI सॉफ्टवेअरच्या आधारे तयार करण्यात आलीय.

तंत्रज्ञानाद्वारे पेन्शनर्स किंवा फॅमिली पेन्शनर ओळखता येणार

या नवीन तंत्रज्ञानाद्वारे पेन्शनर्स किंवा फॅमिली पेन्शनर ओळखता येणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे पेन्शनधारक कोणत्याही अँड्रॉइड आधारित स्मार्टफोनवरून जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतील. या प्रणालीच्या मदतीने डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन संग्रहित केले जाऊ शकते. कोणताही पेन्शनधारक किंवा पेन्शन वितरण करणारी एजन्सी जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन पाहण्यास सक्षम असेल.

काय आवश्यक असेल?

Android स्मार्टफोन
इंटरनेट कनेक्शन
पेन्शन देणाऱ्या एजन्सीमध्ये आधारसोबत नोंदणीकृत क्रमांक द्यावा लागेल
, व आपल्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असावा लागेल.
कॅमेरा रिझोल्युशन 5MP किंवा उच्च असावा


जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे


Google Playstore वर जा आणि AadhaarFaceID अॅप डाऊनलोड करा. यासाठी तुम्ही https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd ला भेट देऊ शकता किंवा https://jeevanpramaan.gov.in/ ला भेट देऊ शकता.

पडताळणीसाठी आवश्यक माहिती भरा

ऑपरेटर प्रमाणीकरण पूर्ण करा आणि ऑपरेटरचा (पेन्शन धारक) चेहरा स्कॅन करा. येथे ऑपरेटर म्हणजे पेन्शनधारक आहे.
आता तुमचा मोबाईल फोन लाइफ सर्टिफिकेट तयार करण्यासाठी वापरा. त्यावर पेन्शनधारकांची पडताळणीही केली जाणार आहे.
पेन्शनर माहिती भरा
पेन्शनधारकाचे थेट छायाचित्र काढा. चांगले चित्र मिळविण्यासाठी पुरेसा प्रकाश जेणेकरून चेहरा ब्लर होणार नाही
आता सबमिट बटण दाबा
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल ज्यामध्ये जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची लिंक दिली जाईल.
जीवन प्रमाण अॅप सध्या फक्त भारतात उपलब्ध आहे. ही सुविधा इतर कोणत्याही देशात दिली जात नाही. पेन्शन वेळेवर मिळण्यासाठी योग्य माहिती भरणे आवश्यक आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!