प्रतिनिधी सुभाष कोटेचा :-
सरपंच व उपसरपंच करतात महिलाच्या मानवी हक्कांचे हनन व देतात मानसिक त्रास, मागील विस वर्षापासून त्रास देण्याचे सत्र सुरू
गावचे सरपंच व उपसरपंचाकडून सतत मानवी हक्कांचे हनन व मानसिक त्रास दिल्या जात असल्याने त्रस्त झालेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर येथील महिला मंगळवारी सकाळी चांदूर रेल्वे पोलिस
स्टेशनवर धडकल्या आणि त्यांनी आपली आपबिती लेखी तक्रारीतून मांडली.
चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर येथील वार्ड क्र.१ दलित वस्तीचा भाग असुन गावचे सरपंच व उपसरपंच त्यांच्यासोबत हुकूमशाही पध्दतीने वागतात.या वार्डात पेयजलाची मोठी समस्या आहे.या वस्तीतील नागरिकांना नळ कनेक्शन दिल्या जात नाही.ऐवढेच नव्हे तर दलित वस्तीतील सार्वजनिक नळाची जोडणी बंद केल्यामुळे या वार्डातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.इतरांकडे पाणी भरायला गेले असता त्यांचे नळ कनेक्शन बंद करू अशी धमकी देतात.
त्यामूळे इतर वार्डातील कोणाही पाणी भरू देत नाही.या संदर्भात तक्रार केली तर नवऱ्याला त्रास देतात.त्यामुळे आमचे नवरे घरी येऊन आम्हाला शिवीगाळ करतात असं या महिलांनी सांगीतले.गावात मोठे अधिकारी आले तर त्यांच्यासमोर बोलु देत नाही.बोललो तर तु लई हुशार झाली का असे काही बाई बोलतात.येता-जाता वाकड्या नजरेने पाहतात,टोमणे मारतात तसेच त्यांच्याच वार्डातील काही लोक त्यांच्या मतांनी ऐकतात व आमचे व्हिडिओ बनवितात गंदे गंदे बोलतात .
अशी लेखी तक्रार सावंगी मग्रापूर येथील वार्ड क्र.१ मधील सविता डोंगरे,सीमा डोंगरे,उषा डोंगरे,माया डोंगरे,सविता बोरकर,अर्चना डोंगरे,संगीता सुखदेवे,सुमन रंगारी,रत्ना मेश्राम,कलावंती खांडेकर,उषा सुखदेवे,डोमाबाई सुखदेवे,कल्पना खांडेकर,आशा मेश्राम,फुलन सुखदेवे,प्रतिभा मेश्राम, सरस्वती डोंगरे,सुनिता गेडाम,प्रभावती चवरे या महिलांनी चांदूर रेल्वे ठाणेदार,तहसिलदार,बिडीओ यांना दिलेल्या व जिल्हाधिकारी,मुख्य कार्यपालन अधिकारी,आमदार प्रताप अडसड यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
१) तक्रारीत देण्यासाठी चालत आल्या पायी
सरपंंच व उपसरपंच यांची गावात प्रचंड दहशत आहे.आम्ही तक्रार करण्यासाठी काल २९ला सायंकाळी निघालो;मात्र एकही ऑटो आम्हाला चांदूर रेल्वे घेऊन जायला तयार नव्हता.त्यामुळे शेवटी आम्ही मंगळवारी सकाळी ७ वाजता पायदळ निघालो आणि ९ वाजता चांंदूर रेल्वेत पोहचलो.येतांना एक महिला चक्कर येऊन पडल्याचे त्यांनी सांगीतले.L
२)सोमवारी बिडीओ आले होते सावंगी मग्रापूरात
सोमवारी चांदूर रेल्वे बिडीओ सुरेश थोरात सावंगी मग्रापूरवासीयाच्या समस्या जाणुन घेण्यासाठी आले होते.मात्र ग्रा.पं.सदस्यांनी त्या महिलांना बोलूच दिले नाही.त्या अनुसूची जातीचे असल्यामुळे त्यांच्यावर सतत अन्याय अत्याचार होत असल्याचा आरोप यावेळी तक्रारकत्र्या महिलांनी केला.तसेच या संदर्भात वारंवार तक्रार करूनही त्यांच्यावर व त्यांच्या माणसांवर कार्यवाही होत नसल्याचे त्यांनी सांगीतले.

३) सरपंच विकतात स्वत: घरी दारू
सावंगी मग्रापुर गावचे सरपंच स्वत: घरी दारू विकतो.त्यासोबत वामन खांडेकर हा दारू विकत असुन उपसरपंच यांच्या सांगण्यावरून महिलासोबत जातीवाद करतात असा गंभीर आरोप तक्रारकर्त्या महिलांनी लेखी तक्रारीतून केला आहे.
