नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत काढणी पश्चात व्यवस्थापन व हवामान अनुकूल मूल्यसाखळीचे प्रोत्साहन तसेच शेतमालवृद्धीसाठी हवामान अनुकूल मूल्यसाखळ्याचे बळकटीकरण करणे या घटकाअंतर्गत ट्रॅक्टर आणि कृषी अवजारे ह्यांचे वितरण दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंतराव वानखडे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी राजकुमार अडगोकर , ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख , सामजिक कार्यकर्ते दत्ता कुंभारकर, आत्माचे विशाल भडके, समूह सहायक काशीकर, प्रतिष्ठित नागरिक नाना येवतकर, समूहाचे अध्यक्ष अंकुश मानकर, समूहाचे उपाध्यक्ष योगेश वरखडे, समूहाचे सचिव निखिल बिजवे, प्रदीप मारके, सुधीर गावंडे, प्रफुल्ल गावंडे, अंकुश येवतकर, अक्षय गावंडे, रणजित ईचे, शैलेश आखरे, आकाश येवतकर, सर्वेश मानकर, वैभव मानकर, वैभव ईचे, ज्ञानेश्वर काळबांडे, दिवाकर गावंडे, ह्यांच्या सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.