स्वराज्य वार्ता ब्युरो रिपोर्ट
पुणे:- राज्यातील अनेक भागात काल सकाळपासून अवकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाची रिमझिम चालू आहे. त्यातच पावसाबरोबर पडलेले धुक्याने दिवसभर अंधारून आले होते.सूर्याचा किरणे देखील क्षणभर पडली नसल्याने व दिवसभर पावसाने व गोठवणाऱ्या थंडीने नागरिकांची तारांबळ उडाली.

काल राज्यात १७६ मिमी पावसाची नोंद हवामान विभागाकडुन झाली.त्यातच मुंबई, ठाणे, रायगड,पालघर, रत्नागिरी, या जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यातच या पावसाची स्वराज्याची राजधानी असलेले किल्ले रायगडावर काल एका शिवभक्तांने पावसात न्हाहून निघालेले छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन याचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. काही मिनिटातच तो विडिओ तुफान व्हायरल होऊन अवघ्या महाराष्ट्राला त्याने वेड लावले.
छत्रपती शिवाजी महाराज पावसातील हा व्हिडिओ रायगड गडावरील असुन काल अनेक शिवभक्तांच्या व्हाट्सअप व इन्स्टाग्राम स्टेटसला दिवसभर जळकत होता. अजुनही प्रत्येक माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे व माझ्या राजाची कीर्ती अजुनही अखंड हिंदुस्थानात व त्यांच्या पराक्रमाचे गोडवे गाताना सध्याच्या युगात सोशल मीडियावर पाहिल की मन धन्य होत…
असा पराक्रमी, शुर, वंदनीय राजाला आमच्या स्वराज्य वार्ता चॅनेलकडुन मानाचा मुजरा🙏🏻