आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील कु. अदिती टाले व कु. क्षितीजा गावंडे यांनी मिळविले यश

दर्यापूर – महेश बुंदे

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूर येथील विद्यार्थिनींनी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय नवी दिल्ली यांच्या कार्यक्रमांतर्गत २९ व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे, या उपक्रमांतर्गत वय वर्ष १० ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून त्यांना वैज्ञानिक संशोधन पद्धतीचे ज्ञान व्हावे या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जातात, सदर परिषदेचे आयोजन जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशा विविध पातळ्यांवर करण्यात येते.

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता बाल विज्ञान परिषदेचा मुख्य विषय ‘शाश्वत जीवनासाठी विज्ञान’ असा असून या अंतर्गत पाच उपविषय ठरविण्यात आले आहे, यासाठी जिल्हास्तरीय बाल विज्ञान परिषद ३ ते ४ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे, जिल्हा स्तरावर एकूण २६६ प्रकल्प प्राप्त झाले होते त्यामधून जिल्हास्तरावर एकूण ८६ समरी प्राप्त झाल्या होत्या त्या समरीमधून परीक्षकांमार्फत काही निवडक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट हे परीक्षण करण्यात आले त्यामधून आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दर्यापूर येथील वर्ग ८ वी च्या दोन विद्यार्थिनी कु. आदिती गजानन टाले आणि कु. क्षितिजा मोहनराव गावंडे या दोघींची जिल्हास्तरीय प्रकल्प सादरीकरण करण्याकरता निवड करण्यात आली आहे, त्यांचा प्रकल्पाचा विषय ‘कडूनिंब आणि गोडनिंबचे पारंपारिक ज्ञान’ हा होता त्यांना शाळेच्या विज्ञान शिक्षिका डॉ. कु. विजया बोंद्रे आणि कु. माधुरी पाटील यांनी मार्गदर्शन केले, या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक गोपालराव गौरखेडे, उपमुख्याध्यापिका सौ. कल्पना धोटे, शिक्षक प्रतिनिधी अनिल भारसाकळे, शिक्षकेतर प्रतिनिधी प्रदीप भारसाकळे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!