कारंजा शहरातील सराईत “हातभट्टीवाला” हनीफ करीम लालुवाले याचेवर एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्दतेची कारवाई

प्रतिनिधी फुलचंद भगत :-

वाशिम:-मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे करणार्‍या इसमाच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध उपाययोजना अवलंबुन जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करून वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत सर्व ठाणेदार यांना आदेशित केले.


कारंजा शहरातील सार्वजनिक सुव्यवस्थाचे दृष्टीकोनातुन पोस्टे कारंजा शहर हददीत राहणारा सराईत हातभटटीवाला हनीफ करीम लालुवाले रा गवळीपुरा कारंजा हा गवळीपुरा येथे गावठी हातभटटीची दारु तयार कररून गवळीपुरा व कारजा शहर परिसरात अवैधरित्या गावठी दारु विक्री करतो. त्याचे या दारु व्यवसायामुळे गावातील व परिसरातील लोक व्यसनाधिन होत
त्यांचे या अवैध दारु विक्री धंदयामुळे तरुण पीढी व्यसनाधिन,अक्रियाशील, बेरोजगार होतात त्यामुळे त्यांचे आयुष्य ऊध्वस्त होत आहे.

तसेच स्त्रिया व मुलींना छेडछाडीच्या यातना होत आहे,त्यांचे दहशतीमुळे महिला,मुली त्याचे विरुध्द तक्रार देत नाहीत.

सराईत हातभटटीवाला हनीफ करीम लालुवाले रा गवळीपुरा कारंजा जि वाशिम याने गावठी हातभटटीची दारु तयार करून गाळणे,वाहतुक करणे, विक्री करण्यापासुन परावृत्त व्हावे स्त्रिया,मुली यांचे संरक्षण व्हावे,व्यसनापासुन मुले व्यक्ती याना मुक्ती मिळावी, सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा उत्पन्न न होण्यासाठी नमुद इसमास महाराष्ट्र झोपडपटटी दादा, हातभटटीवाले व औषधीद्रव्ये विषयक गुन्हेगार व्हिडीओ पायरेटस,वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ (सुधारणा १९९६,२००९ व २०१५) चे कलम ३(१) अन्वये कार्यवाही करुन स्थानबध्द करण्याबाबत स्थानबध्दतेचा (एमपीडीए) प्रस्ताव मा. जिल्हा पोलीस अधिक्षक याचे आदेशान्वये यांचा एम.पी.डी.ए कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्यात आला.

सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा.पोलीस अधिक्षक यानी हनीफ करीम लालुवाले रा गवळीपुरा कारंजा यांचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी श्री. शण्मुगराजन यांचे समक्ष सादर केला.मा. जिल्हादंडाधिकारी श्री. शण्मुगराजन यांनी सादर प्रस्तावाचे बारकाईने व कायद्याच्या तरतुदीचे योग्य अवलोकन प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला. शासनाकडुन सदर प्रस्तावास मान्यता मिळाल्याने दिनांक ३०/११/२०२१ रोजीचे आदेशाने अनुषंगाने हनीफ करीम लालुवाले रा.गवळीपुरा कारंजा याचेविरूद्ध स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले.

मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह जनतेस आवाहन केले की, वाशिम जिल्हयात अशा प्रकारचे गुंडगिरी करणारे,अवैध धंदे करणाऱ्या इसमाविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल. तरी जनतेने अशा गुंड प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध न घाबरता पुढे येवुन पोलीस ठाणे येथे तक्रारी कराव्यात जेणे करून अशा गुंड प्रवृत्तीच्या इसमांच्या मुसक्या आवळण्यात येतील.यावर्षातील स्थानबध्दतेची ही ५ वी कार्यवाही असुन यापुढेही कार्यवाही सत्र असेच सुरु राहणार असल्याचे संदेश मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी दिलेले आहेत.

सदर स्थानबध्दतेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात मा. अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जाधव,पोलीस निरिक्षक आधारसिंग सोनोने ठाणेदार पोलिस स्टेशन कारंजा शहर स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, विजय जाधव,प्रमोद इंगळे व पोलीस उप निरीक्षक शब्बीर खान पठाण,पोना राजेश गिरी,प्रशांत राजगुरु,अश्विन
जाधव,गजानन गोटे,प्रविण राऊत,संतोष शेणकुडे, यांचे पथकाने मोलाची कामगिरी बजावली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!