जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

प्रतिनिधी फुलचंद भगत


वाशिम: 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक पुरुष नसबंदी पंधरवाडा निमित्ताने आज 1 डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. डॉ. अविनाश झरे आणि डॉ. अनिल कावरखे यांनी दोन रुग्णांची पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करुन हा पंधरवाडा साजरा केले. यावेळी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. यादव, डॉ. अविनाश झरे, डॉ. अनिल कावरखे, डॉ. दुगाने, डॉ. जाधव, डॉ. हेबांडे, डॉ. शेख, डॉ. गुंजकर तसेच बाहयसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. हेडाऊ, डॉ. राठोड यांची उपस्थिती होती.

पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया कार्यक्रमात मान्यवरांनी पुरुष नसबंदीबाबत मार्गदर्शन केले. पुरुष नसबंदी पंधरवाडयामध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार, निलेश गागेराव यांनी पुरुष नसबंदी शस्त्रक्रीया केली. तसेच समाजातील इतर पुरुषांनी स्वेच्छेने नसबंदीसाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाला जयश्री भालेराव, मिना संगेवार, ॲड. राधा नरवलिया, ललिता घुगे, श्रीमती झोड, नितीन व्यवहारे, श्री. डहाळे, श्रीमती धात्रक, श्री. गायकवाड, श्रीमती डाखोरे, श्रीमती पाईकराव, श्रीमती कसारे, श्री. इंगोले, संदेश डहाळे, प्रगती मासोतकर यांची उपस्थिती होती.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!