पहिलीतून थेट तिसरीत जाण्याचा विद्यार्थ्यांना आनंद,प्रदीर्घ विश्रांतीनंतर पहिली ते चौथीच्या शाळा गजबजणार

वार्तापत्र – महेश बुंदे

कोरोनामुळे पहिलीत असणाऱ्या विद्यार्थी मागील वर्षी दुसरीचा वर्ग न पाहता पास झाला आता तो थेट तिसरीच्या वर्गात जाऊन शिक्षण घेणार आहे. दुसरीचा वर्ग न बघताच पहिलीतून उडीमारून तिसरीच्या वर्गात जाणारे विद्यार्थी आनंदी वातावरणात असल्याची दिसते. आजपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होणार असल्या तरी ज्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षांपूर्वी पहिली मध्ये प्रवेश घेतला त्यांनी शाळाच पाहिले नाही. बालवाडीतील सरळ दुसरीच्या वर्गात जाण्याचा योग या विद्यार्थ्यांना येणार आहे. चिमुकल्यांसाठी प्राथमिक शिक्षण महत्त्वाचे असते परंतु कोरोनामुळे शाळाच भरली नसल्यामुळे याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर झाला आहे. विशेष इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. बाराखडी, उजळणी, जोडाक्षरे, बेरीज व वजाबाकी ही प्राथमिक ज्ञान या विद्यार्थ्यांना शाळेत मिळत असते. शहरी भागात कसेबसे ऑनलाइन शिक्षण मिळाले मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. हे प्राथमिक ज्ञान घेताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कसरत करावी लागली. ग्रामीण भागामधील तोंगलाबाद या आदर्श गावात शिक्षकांच्या समवेत पदवी पदवीत्तर विद्यार्थ्यांनी ‘शाळा बंद परंतु शिक्षण सुरू’ हा उपक्रम राबवला होता यामुळे थोडाबहुत फायदा विद्यार्थ्यांना झाला परंतु ग्रामीण भागातील पालकांना आपल्या पाल्याकडे लक्ष देता आले नाही.

आता प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिनांक १ डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू केले आहे यामुळे या वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी शाळेत जाण्याच्या तयारीला लागले आहेत. ती पुस्तक व इतर शालेय साहित्याची जुळवाजुळव केली जात आहे. शाळेमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे शिक्षक विद्यार्थ्याअभावी अस्वस्थ होते. आता मात्र शाळेतील घंटा वाजणार असल्याने शिक्षकांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात तरी कोरोणाचे संकट पुन्हा येऊ नये व पुन्हा शाळा बंद पडू नये व विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये असे पालक, विद्यार्थी, सर्व शिक्षकांना वाटत आहे

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!