राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे व रयत शिक्षण संस्थेच्या वतीने साहित्याचा पुरस्कार प्रदान
अंजनगाव सुर्जी – महेश बुंदे
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथील सुनबाईचा सावित्रीबाई फुले पुरस्काराने रविवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी पुणे येथील राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने साहित्याचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे व रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार हा महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना दिला.
यावर्षी हा पुरस्कार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या १५ महिलांना देण्यात आला असून त्यात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील सुपुत्री व सातेगाव येथील सून सौ जयश्री नरेश रोहनकर, आई कडील नाव पाटकर यांना आज साहित्य क्षेत्रासाठी सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार पुणे येथील माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी,ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक डॉ.श्रीपाल सबनीस,डॉ. ललिता सबनीस,प्रा.प्रकाश रोकडे, प्रा. चंद्रकांत वानखेडे,मराठी विभागप्रमुख डॉ.आंधळे,डॉ.नगरकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. हा सोहळा पुणे येथील पत्रकार भवन नवी पेठ येथे संपन्न झाला. या पुरस्काराने अंजनगाव सुर्जी तालुक्याची मान उंचावली असून ही तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. या विदर्भ कन्येने आपली मायबोली वऱ्हाडी भाषा पुण्यातील पुणेरी भाषेच्या मधात राहून व एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत बारा तास काम करुन जिवंत ठेवली आणि त्या मायबोली वऱ्हाडी भाषेत साप्ताहिक सदर मध्ये जनाबाईचं गाठोळ या लेखाच्या माध्यमातून या वऱ्हाडी भाषेला राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळवून दिला ही आपल्या विदर्भासाठी व अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. या पुरस्काराने तालुक्याची वऱ्हाडी भाषेची मान उंचावली आहे.