राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर; जाणून घ्या सविस्तर

मुंबई वार्ता:- दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रोन व्हेरिएंटनं जगभरात खळबळ माजवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका ओळखून देशांमध्ये सतर्कतेचं वातावरण आहे.

कोरोनाच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाची वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन होऊ द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे अशी काही बंधने पाळावीत लागतील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीचे दोन्ही डोस प्रत्येकाने घेणे, विशेषतः विमानतळावरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत प्रवाशांची काटेकोर चाचणी करणे यादृष्टीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.

● कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजल्यानंतर महाराष्ट्रात राज्य सरकारने देखील निर्बंध लागू केले आहेत.
● राज्यात आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक वाहतूकीतून प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. राज्य सरकारने काय नवीन नियमावली जाहीर केली आहे? याबाबत आपण जाणून घेऊ

जाणून घ्या नियमावली

सर्वत्र मुखपट्टी (मास्क)परिधान करणे आवश्यकच, मुखपट्टीशिवाय कोठेही फिरता येणार नाही, रुमालाला परवानगी नाही, तोंडाला रुमाल गुंडाळल्यास ५०० रुपये दंड.
● रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल.
● लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाही.
● महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र बंधनकारक
● किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक
● सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल.
● मास्क घातलेला नसेल तर ५०० रुपये दंड
● दुकानात ग्राहकाकडे मास्क न घातल्यास दुकानदाराला १० हजार दंड,
● मॉलमध्ये कुणी मास्क न घातल्यास मालकाला ५० हजार दंड
● राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड
● भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ २५ टक्के लोकांनाच उपस्थिती
● टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड
● तसेच वाहन मालकासही ५०० रुपये दंड ठोठावण्यात येईल.
● किमान ६ फूट अंतर राहील असं सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं.
● सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई

नियमांचे पालन करणे बंधनकारक
● नेहमी योग्य पद्धतीने मास्क परिधान करा.
● रुमालाला, मास्क समजले जाणार नाही आणि रुमाल वापरणारी व्यक्ती, दंडास पात्र असेल.
● साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार व स्वच्छपणे हात स्वच्छ धुवा.
● कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असलेले सर्व नियमांचे पालन करावे

केंद्राच्या राज्यांना सूचना
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून ओमिक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठीच्या सूचना केल्या आहेत. राज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर देखरेख ठेवणे, त्यांनी मागील कालावधीत केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती, तपशील घेण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली आहे. संसर्गाची जोखीम असलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांची तत्पर INSACOG लॅबमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात यावे, अशी सूचना राज्यांना देण्यात आली आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!